Ticker

6/recent/ticker-posts

जीवघेणे रस्ते व खड्ड्यांचे त्वरित दुरुस्ती कार्य करावे: ग्रीन हेरिटेज


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-रस्ते ही संचार, व्यापार,  सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या जीवनरेखा असतात. एक चांगले रस्ते नेटवर्क सर्वांसाठी जीवनाची गुणवत्ता वाढवते. परंतु भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांचे नेटवर्क अत्यंत पिछाडलेले आणि निम्न स्तराचे असून सडकांवरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. नुकत्याच ग्रीन हेरिटेज संस्थेने केलेल्या निरीक्षणात संपूर्ण शहरात रस्त्यावरील खड्ड्यांनी शहराची अवस्था दयनीय केली आहे.  अवस्था अत्यंत वाईट असून, धुळीचे आणि चिखलाचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. अनेक ठिकाणी सडकांवर उंचवटे ,कुबड निघालेले आणि खड्डे असल्याने लोडेड ट्रक्स व इतर वाहनांना हिचकटणाऱ्या अवस्थेतून नागिण डान्स करीत जावे लागते.
राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील चकरा मार्ग, भंडारा शहर, प्रत्येक गल्ल्या-कुंड्यात, भंडारा ते वरठी, तुमसर, सिहोरा आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, शेकडो खड्डे जीवघेणे ठरत आहेत. नागपूर नाका ते राजीव गांधी चौक येथील काम दीड वर्षापासून सुरू असूनही निधीच्या अभावी अपूर्ण आहे. मातोश्री हॉस्पिटल ते मेघरे नर्सिंग होम आणि शास्त्री चौक येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत खालावलेली आहे. त्रिमूर्ती चौक ते बस स्टँड, शास्त्री चौक, खाम तलाव, गांधी चौक, मिस्कीन गार्डन चौक, मुस्लिम लायब्ररी चौक ते राजीव गांधी चौक या मार्गावरील सडकेची अवस्था अत्यंत वाईट आहे.आधी खड्डे बुजवा,आणि नंतर रस्ते तयार करा इतर 
समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनने सार्व .बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग भंडारा यांना पत्र दिले आहे. पत्र देताना संस्थेचे संस्थापक मो. सईद शेख आणि सदस्य लियाकत खान उपस्थित 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या