Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:  गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.शासनाने ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 
 मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी व परिसरात झालेल्या पावसामुळे धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे.कापायला आलेला धान पावसामुळे पूर्णपणे पाण्यात सापडून खराब झाला आहे.महाराष्ट्र शासन आता तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक विम्याचे पैसे देणार काय? की नेहमीप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून त्यांच्या आत्महत्येची वाट बघत बसणार ?शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे,कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे व कार्यकर्त्यांनी  केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या