चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : -- येथील संतोष नागपुरे भारतीय जनता पक्ष - मच्छिमार आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकास कामाचे निवेदन दिले आहे भद्रावती शहर हे औद्योगिक - ऐतिहासिक तथा धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेले शहर आहे येथे पर्यटणास भरपूर वाव असल्याने अनेक धार्मिक स्थळी पर्यटक ये - जा करीत असतात तसेच औद्योगिकरणाचा विचार केला तर आयुध निर्मानी चांदा - कोल माईन्स व इतर अनेक उद्योग येथे आहे तसेच ताडोबा अंधारी प्रकल्प सुद्धा ह्या शहरा जवळच आहे परंतु मागील काही वर्षा पासून ज्या प्रमाणात देशाचा विकास झाला त्या प्रमाणात शहराचा विकास झालेला नाही त्यामुळे नागरिकांचे सोईसुविधा करिता विकासाच्या दृष्टीने खालील प्रास्ताविक कामे निधी मंजूर झाला आहे कामाचे नाव प्रभाग क्रं - 7 मधील शकील चिकन सेंटर ते वाल्मिक चौक पर्यंत सिमेंट कांक्रेट रस्ता बांधकाम  बावीस लाख चौपण हजार रुपये मंजूर, प्रभाग कं - 7 मधील डॉ ठाकरे यांचा दवाखाना ते नेहारे यांचे घरापर्यंत सिमेंट कांक्रेट रस्ता बांधकाम सात लाख  पंचेचाळीस हजार रुपये मंजूर यांची निविदा झाली आहे 
मुख्यमंत्री सचिवालय हेद्राबाद हाऊस नागपूर यांचे पत्र दिनांक : - 14 / 02 / 2025 जावक क्र : - 976 जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचे पत्र प्राप्त झाले आहे असे संतोष नागपुरे यांनी सांगितले