Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी येथील उघड्यावर आणि अवैध मांस विक्री करणा-यांवर कारवाई होणार..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर:- तालुक्यातील हाळीहंडरगुळी या २ गावातून नांदेड-बिदर हा अंतर राज्य मार्ग गेला आहे.तसेच याच रोड लगत २ गावची बाजार पेठ,जि.प.कें प्रा.शाळा असून याच शाळेसमोरुन गेलेल्या रोडवर असलेल्या सा.बां. खात्याच्या जागेवर अतिक्रमण करुन मांस उघड्यावरच मांस विक्री दुकाणे थाटली आहेत.आणि ते पण विना पास, अवैध ! तरीही याकडे ना सा.बां खाते लक्ष देत.व ना अन्न व औषधी प्रशासन खाते. तसेच शिक्षण खाते.यामूळे जनतेत आश्चर्य व्यक्त केले जाते.
येथील नांदेड-बिदर हा रोड अत्यंत गजबजलेला असून याच रोड लगत जि.प.शाळेचे केंद्र असलेली १ली,ते ७वी.पर्यंतची शाळा व सा.बा.खात्या ची जागा आहे.तरीही या ठिकाणी कित्येक वर्षापासून बिनधास्तपणे उघड्यावर मांस विक्री होते.ती पण विनापरवाना,अवैध व सा.बां.खात्याने बांधलेल्या गटारीवर.आणि हा सगळा गोरख धंदा शिक्षण, बांधकाम तसेच अन्न व औषध खाते यांना माहिती आहे.तरीही याकडे या सर्व खात्याचे अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष होत असून या दुर्लक्षामागे नक्कीच मोठा "अर्थ" दडलेला असावा.अशी दाट शंका येते.
हाळी-हंडरगुळी या २ गावच्या अति म्हत्वाच्या जागेत विशेष म्हणजे जि. प. शाळेच्या मेन गेट लगतच अवैध व उघड्यावर दोन्ही बाजूने अत्यंत खुले आमपणे मांस विक्री होते.आणि हे विक्रेते चिकन,मटन दुकाणातील घाण पाणी,रक्त, हाडं,पंखं,मांसाचे तुकडे असे टाकाऊ, वेस्टेज पदार्थ महामार्गावरच टाकत असल्याचे दिसते.यामूळे तेथे मोकाट कुञ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.येथून हंडरगुळी येथील विविध मंदीरात दर्शनासाठी जाणा-या हाळी व आस पासच्या मोरतळवाडी,खरबवाडी, चिमाचीवाडी,रुद्रवाडी,वंजरवाडी, वायगाव,बोरगाव आदी गावातील भक्तांना मांस विक्रेत्यांनी रोडवर टाकलेली घाण तुडवत ये-जा करावे लागते.यामूळे महिला भक्तांमध्ये तीव्र संताप स्थानिक प्रशासनासह वरील खात्याविरुध्द पसरला असून हा राग अनावर होण्यापुर्वीच संबंधितांनी या ठिकाणी पाहणी करुन महाराष्ट्र घन कचरा अधिनियम १६ नुसार कडक कारवाई करावी.आणि येथील अवैध मांस विक्री सेंटर्स अन्यञ हलवावीत. अशी मागणी जोर धरत आहे.
*मांस विक्रेत्यांनी वेस्टेज साहित्य रोड व नदीत टाकण्याऐवजी स्व घरात किंवा दुरवर त्याचे विल्हेवाट लावावी.तसेच दिवाळी नंतर नोटीसा देणार आणि २०१७ प्रमाणे अतिक्रमण काढणार आहोत. अशी माहिती सुनील नरहरे अभियंता सा.बां. विभाग उदगीर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या