Ticker

6/recent/ticker-posts

आयुध निर्मानी चांदा तर्फे उत्कृष्ठ कामगार पुरस्कार निखिल घिवे यांना प्रदान


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील आयुध निर्मानी चांदा भद्रावती येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ कामगार पुरस्कार नुकताच कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम एम - आय - मयुनिशन्स इंडिया लिमिटेड स्थापना दिवसा निमित्याने देण्यात येतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण कुमार चीफ जनरल मॅनेजर हे होते 
तर प्रमुख पाहुणे म्हणून गौरव मालवी डी जि एम, डब्लू डब्लू ऐ अध्यक्षा व अनेक अधिकारी गण मंचावर उपस्थित होते. जे कर्मचारी आयुध निर्मानी मध्ये देशासाठी मेहनत घेऊन तन - मनांनी अहोरात्र मेहनत घेऊन शासकीय कामा मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो या मध्ये निवड प्रक्रिया असते या मध्ये बरेच कामगारांचा उत्कृष्ठ कामगार म्हणून सम्मान केला जातो 
उत्कृष्ठ कामगारांची दखल घेऊन निखिल नानाजी घिवे यांना 
अग्नीरत्न कॅटेगरी मधून निर्मानीतील यांची निवड करण्यात आली 
निखिल घिवे यांना प्रवीण कुमार चीफ जनरल मॅनेजर / आय - ओ - ऐफ -  ऐस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला 
या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले 
कार्यक्रमाचे संचालन अंकिता मिश्रा यांनी केले व आभार प्रदर्शन संगीता मुळे यांनी मानले 
या कार्यक्रमा मध्ये हजारो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 
याचे श्रेय निखिल घिवे यांनी आई - वडील यांना दिले निखिल घिवे यांचे सेक्शन मधील अधिकारी - कर्मचारी ओ - एफ - चांदा व समाज बांधव - मित्र परिवार व परिवार यांचे कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या