Ticker

6/recent/ticker-posts

सहज सुचलंच्या मार्गदर्शिका तथा प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार यांचा नागपूरात भव्य सत्कार!

सामाजिक, कला व साहित्यिक क्षेत्रातील मंडळींकडून चिमड्यालवारांचे अभिनंदन 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपुर : नागपूर येथील श्री गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा विदर्भातील सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार यांचा नुकताच उपराजधानीत भव्य सत्कार करण्यात आला.तदवतचं
 कवयित्री चिमड्यालवार यांना  त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल  सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला .
हा सन्मान पुरस्कार त्यांनी पारायण समितीचे अध्यक्ष गजानन देशपांडे यांच्या हस्ते स्वीकारला.
या पुरस्कार समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अर्धांगिनी ज्योति बावनकुळे, आमदार संदीप जोशी, विठोबा दंतमंजनचे निर्माते कार्तिक शेंडे नागपूर टीव्ही चॅनल्सचे अध्यक्ष 
उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून त्या नियमित साहित्य लिहित असून आज पर्यंत महाराष्ट्रात विविध ठिकाणी पार पडलेल्या अनेक कविसंमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
एव्ढेच नाही अनेक सन्मान व गौरव पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.
सहज सुचलं ह्या व्हाॅट्सअप गृपवरील  संस्कार धारा ह्या सदरात त्या नियमितपणे लिखाण करीत असतात.
शालेय जीवनापासून त्यांना साहित्य क्षेत्रात विशेष रुची व आवड आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील त्या मुळ रहिवाशी असून त्या या जिल्ह्यातील एक परिचित  व नामवंत कवयित्री आहे.
त्यांचा उपराजधानीत सन्मान पुरस्कार देऊन सत्कार झाल्याबद्दल कला,सामाजिक,व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी अभिनंदन केले आहे.
----------------------------------------------
सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई व अधिवक्ता मेघा धोटे यांनी केले कवयित्री शैला चिमड्यालवार यांचे अभिनंदन! 
----------------------------------------------
उपराजधानीत कवयित्री शैला चिमड्यालवार यांना  सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका, समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, सविता कोट्टी, समाजसेविका चंदा कामडी, मंगल मिसाळ, सीमा पाटील, अश्विनी दीक्षीत, प्रांजू मखरे, प्रविणा वाघाडे, वंदना उपगन्लावार, कविता दिकोंडवार,स‌ंजीवनी धांडे, वनिता झाडे, मृणाल कांबळे,अल्का मोटघरे, अल्का सदावर्ते,किरण साळवी, विद्या पिंजरकर, अपर्णा चिडे, समता बन्सोड, सरोज हिवरे, चैताली आतराम, अंजली इटनकर, वैजयंती गहुकर, स्नेहा मडावी, प्रियंका बेन्द्रे, माधूरी सोनटक्के, रिना तेलंग, अर्चना जाधव, अर्चना समर्थ,शिला जाधव, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, रश्मि हिवरे,पूनम मडावी, गायत्री श्रीरामे, रोहिणी पराडकर, श्रध्दा परिमल,अधिवक्ता सारिका टेंभरे, अधिवक्ता प्रेरणा सहारे, पूजा मंगाम, श्वेता मंडलवार जयश्री दीक्षीत, अनुष्का गुंडावार, साक्षी वाडगूरे, वंदना हातगांवकर, विमल काटकर, भाग्यश्री हांडे, नजमा शेख, आदिंनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या