Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग बांधवांचे तहसील कार्यालय वर शिट्टी बजाव आंदोलन यशस्वी


विजय चौडेकर, चित्रा न्यूज जिल्हा प्रतिनिधी ,

नांदेड -नायगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवानी आज तहसील कार्यालय व पं.स.वर शिट्टी बजाव आंदोलन चे आयोजन केले होते,
यात दिव्यांग बांधवांच्या 13 मागण्या होत्या त्या तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अधिकारातील मागण्या तत्काळ मंजुरी देण्यात आली व काही मागण्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्या व उर्वरीत मागण्या ह्या मुख्यमंत्री  यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी घेतली.
यावेळीं शिट्टी बजाव आंदोलनाला शिवराज पा.होटाळकर,गजानन पा. चव्हाण,श्रीराम पा. पवार, मारोतराव मंगरुळे ,राजेश बेळगे,मिलींद कागडे, चांदू आंबटवाड, शांताबाई चिंतले, साईनाथ बोईनवाड,रामदास भाकरे, तिरुपती कदम, शेख मौलाभाई नरसी,माधव शिंदे ,गोविंद होळकर, मल्हारी महादाळे, राजू ईरेवाड,एकनाथ संत्रे ,मिना शिंदे व तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या