चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-यावर्षी जुन ते २६ आॅगस्ट पर्यंत पावसाने हलकी-फुलकी हजेरी लावली होती.म्हणुन याच पावसावर खरीपातील सोयाबीन व अन्य पीकं कशीबशी तगली.आणि कसा का , असेना खरीप हंगाम हाती लागणार आणि यंदा दसरा,दिवाळी आनंदात साजरी करणार.अशी भोळीभाबडी आशा भोळाभाबड्या शेतक-यांना होती.
पण,२७आॅगस्ट ते२७सप्टेंबर या महिनाभरात निसर्गाने असा काय रंग दाखविला की,सगळी शेती वाया गेली.आणि ऐन दसरा,दिवाळीच्या तोंडावर काढणीला येणारे सोयाबीन पाण्यात फसले.अण् शेतक-यांच्या जीवनात काळोख पसरला ! असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
यंदा हंडरगुळी भागात ऐन रासणी करायच्या वेळेसच कोसळलेल्या धुवांधार पावसाने शेती व पिकांचे खुपच नुकसान झाले.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी काळजीत पडला.पण गत ४,५ दिवसापासून उघाड दिल्यामुळे चिखलात फसलेले सोयाबीन काढूण घेण्यासाठी व काढलेल्या सोयाबीन ची बनीम रचण्यासाठी हंडरगुळीच्या शेतकरीवर्गांची धावपळ सुरु झाल्या चे चिञ हंडरगुळी,सुकनी,शेळगाव, मोर्तळवाडी,रुद्रवाडी,वडगाव,किनी, खरबवाडी,वायगाव,आनंदवाडी या व आसपासच्या शिवारात दिसते. तरीही शेतक-यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतोच आहे.
कारण,सोयाबीन काढणी व रासणी दरम्यान पुन्हा पाऊस आला तर..! या भीतीने शेतक-यांची धडकन तेज होत चालली असून शासकीय मदत कधी मिळणार?याकडे लक्ष लागलेय
दरवर्षी सारखे यंदा पण आमदनी आठ्ठनी,खर्चा रुपया ! अशी गत आहे कारण,पेरणी ते काढणी दरम्यानचा खर्चाची बेरीज केली तर शेतक-यांना छदामही नफा आजवर झाला नाही. आणि यंदा तर नफा तर सोडाच.पण मुद्दल ही हाती लागणार नाही.म्हणुन आमदनी अठ्ठनी अण् खर्चा रुपयाा! अशी गत शेतक-यांची झालीय.
खलील टप्पेवाले,शेतकरी,हाळी..
काढणीला आलेले सोयाबीन परवा च्या मोठ्या पावसाने पाण्यात फसून काळवंडले असून,याला बाजारात योग्य किंमत मिळणे दुरापास्त झाले आहे.एकीकडे शेतीचा वाढलेला खर्च अण् दुसरीकडे मिळणारा कमी दर,या दुहेरी कैचीत शेतकरी आहेत. संग्राम भोसले,चेअरमन,हंडरगुळी..
यंदा पावसाने पिच्छा सोडलाच नाही कारण,मे मध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला.आणि आता परतीचा. यामूळे शेती व पीकं उध्वस्त झालीत. आजघडीला पाऊस आराम करत असला तरीही सप्टेंबरच्या शेवटी जो पाऊस पडला.त्याचे घुडघाभर पाणी आजही अनेकांच्या वावरात आहे.व या चिखलपाण्यातूनच बचेकुचे सोयाबीन काढताना आईचे दूध आठवतेय.
बब्रूवान सुकणे,शेतकरी,सुकणीकर,
आॅगस्ट ते सप्टेंबर असा मुसळधार पाऊस झाल्याने पीकं गुडघाभर चिखलासह पाण्यात अडकलीत.त्या पैकी सध्या सोयाबीन काढत असून त्याची गुणवत्ता खालावली आहे.तरी शासनाने गुणवत्ता न पाहता घोषित केल्याप्रमाणे हमीभाव द्यावा.
हामजा शेख(टेलर),शेतकरी,हाळी..
जीवतोड मेहनत करुन जगवलेले पीक हाती लागेल.असे वाटत होते. पण अचानकच निसर्गाने घात केला. आणि ऐन काढणीला आलेल्या सोयाबीनचे खोयाबीन केले.म्हणुनच दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या दरम्यानच शेतक-यांच्या जीवनात काळोख पसरला आहे.तरी शासनाने त्वरीत सरसकट हे.५०हजार भरपाई द्यायलाच पाहीजेत.
अशोक धूप्पे,शेतकरी,हंडरगुळी..


0 टिप्पण्या