Ticker

6/recent/ticker-posts

खर्डा शहरातील साठे नगर येथे लहुजी वस्ताद साळवे यांची 231 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातील साठे नगर येथे अद्यक्रांति गुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांची 231 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अद्यक्रांति गुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा असलेल्या फोटोला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
        तसेच परिसरात असलेल्या बौध्द विहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साठे नगर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
           खर्डा शहरात वीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती दरवर्षी साजरी करण्यात येते,जयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.   231 व्या जयंती निमित्त येथील जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आयोजकांकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.तसेच वृक्षारोपन करण्यात आले.
             यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुनिल लोंढे,जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटिल,लोकशाहिर आण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष विलास नाना जाधव,आयोजक गणेश जाधव,लेखणी सम्राट वृत्त समुहाचे संपादक बाळासाहेब शिंदे,ग्रामपंचायत सदस्य दिपक जावळे,अमोल नवले,डाॅ.भोरे सर,राहुल सुळ,जयवंत गायकवाड,दादा मोरे,किरण जाधव,शंकर गायकवाड,लखण जाधव,राहुल ढाले,प्रकाश सुरवसे,शेखर लोखंडे,सचिन जाधव,प्रवीण जावळे,समाधान जाधव,अतिश जाधव,विशाल अरुणे,लाल्या मोरे,पप्पू आल्हाट,निखील अडागळे,ऋषी शिंदे,सुरज लोंढे,फकिर मदारी,हुसेन मदारी,राजु सय्यद,आलीशर कुरेशी आदि.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
               या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गणेश (भाऊ) जाधव मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या