Ticker

6/recent/ticker-posts

उसर्रा चे पोलीस पाटील समीर दुलेखां पठाण यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले सम्मानित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-उसर्रा येथील समीर खां दुलेखा पठाण यांना आंधलगाव येथे पोलिस विभागाच्या समीक्षा (आढावा) बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नुरूल हसन यांनी सन्मानित करून प्रमाणपत्र प्रदान केले. गांवात कायदा, शांती, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलिस विभागाला वेळोवेळी त्यांच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.

या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि जिल्ह्याचे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांना देखील सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या