Ticker

6/recent/ticker-posts

मुल नगर परिषद निवडणूक! प्रभाग क्रमांक 6 मध्ये हवा मतदारांना नवा चेहरा


काँग्रेसच्या नलिनी आडपवार यांची  प्रचारात आघाडी 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुल (चंद्रपूर) :  येत्या 2 डिसेंबरला होवू घातलेल्या सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीसाठी मुलच्या प्रभाग 
6 (ब गट) मध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या नलिनी दिनेश आडपवार यांना नगरसेवक पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने रिंगणात उतरविले आहे.
सध्यास्थितीत आडपवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे एकंदरीत आज दिसून आले. प्रभागातील" घर ते घर" असा त्यांचा प्रचार सुरू असून कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह त्या भागातील मतदाते त्यांचा प्रचार खूद्द मोठ्या जोमाने करीत आहेत.
या प्रभागात तेथील मतदारांना नगरसेवक रुपाने नवा चेहरा हवा असल्याचे बोलल्या जात असून आज पर्यंत मुलच्या सामाजिक कार्यात नलिनी आडपवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे हे कोणी नाकारू शकत नाही.
प्रभागातील जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध राहु असे त्यांनी रविवारी सदरहु प्रतिनिधीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.
या प्रभागात एकूण मतदार 2119 असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 1046 तर स्री मतदारांची संख्या 1073 इतकी आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या