Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श केसलवाडा/पवार येथे ‘विकसित भारत-रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण 2025’ योजनेचा थाटात शुभारंभ


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी (श.प्र.) :-तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत केसलवाडा/पवार येथे दि. 2 जुलै 2026 रोजी ‘विकसित भारत-रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) 2025’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. गट विकास अधिकारी मा. संदीपजी पानतावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


आम्रवृक्ष रोपणाने झाली सुरुवात
योजनेचा शुभारंभ स्मरणीय राहावा यासाठी गट विकास अधिकारी पानतावणे यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात आम्रवृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर योजनेच्या माहिती फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच रोमिला बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्रामपंचायत अधिकारी दत्ता पोहरकर, सामाजिक कार्यकर्ते कैलासजी भगत, सहा.कार्यक्रम अधिकारी राहुल गिर्हेपुंजे, अविनाश गणवीर, तांत्रिक अधिकारी महेश बर्वे, आनंद वाघाये,राकेश दाते, सुधाकर कांबळे,अमरदीप शेंडे, रजनी नांदगावे, किरण बावनकुळे, डाटा ऑपरेटर लिलाधर रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाला जयश्री येळेकर, मिनाक्षी रहांगडाले, दिक्षा येळेकर, वनिता कावळे, नंदलाल नंदेश्वर, सचिन वल्के, मनिष मडामे, राधेलाल बिसेन, सतिश बिसेन, गणराज बिसेन, मुनिश्वर बोपचे, खुशाल बोपचे यांच्यासह गावातील महिला, युवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                              

                  गट विकास अधिकारी संदीप पानतावणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “VB-G RAM G ग्रामीण 2025 या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे हा आहे. शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, बचत गटांच्या माध्यमातून उत्पादन व विपणन साखळी निर्माण करून प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वाढवणे व ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करणे, हे या मिशनचे ध्येय आहे.”तर सरपंच रोमिला बिसेन म्हणाल्या, “आदर्श गाव म्हणून केसलवाडा/पवारची निवड होणे अभिमानास्पद आहे. या योजनेचा लाभ घेऊन गावातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास आहे.”तसेच ग्रामपंचायत अधिकारी दत्ता पोहरकर यांनी योजनेची सविस्तर माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गिर्हेपुंजे यांनी केले तर आभार अनिल नंदेश्वर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या