Ticker

6/recent/ticker-posts

करंजी मध्ये आणखी एक मानाचा तुरा रती साहेबराव देशमुख यांना बी. ए. एम. एस. ही पदवी प्रदान......

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 नांदेड:- हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान रती साहेबराव देशमुख यांना मिळाला आहे श्री. के. आर .पांडव. आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली रती साहेबराव देशमुख हिने बी .ए. एम. एस. या शेवटच्या वर्षी विशेष प्राविण्यासह ही परीक्षा उत्तीर्ण केली असून नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारोह समारंभात ही पदवी तिला प्रदान करण्यात आली आहे. ती करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनारी येथील प्राथमिक शिक्षक साहेबराव देशमुख यांची कन्या आहे तिचे प्राथमिक शिक्षण सुरज देवी भिकुलाल आर्य कन्या विद्यालय हिंगोली येथे झाले आहे. रती ला शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले पहिले पासूनच घरात शैक्षणिक वातावरण होते वडील शिक्षक व आई शिक्षिका असल्यामुळे घरातच आईवडिलांची त्यांच्यावर विशेष लक्ष होते .या मिळालेल्या यशाचे श्रेय तिने तिचे आई-वडील यांना दिले आहे. या यशाबद्दल समस्त करंजी वाशियांनी   देशमुख कुटुंबाचे यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या