चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य तसेच नाभिक युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नागदीवाळी शुभ मुहूर्तानिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र श्री संत नगाजी महाराज पारडी (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथे आज दि. 29 नोव्हेंबरला सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत श्री क्षेत्र संत नगाजी महाराज देवस्थान पारडी येथे असणार आहे.
हे शिबिर भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार असून परिसरातील सर्व श्रद्धावान भक्तगण व गावकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरानिमित्त राष्टीय पुरस्कारप्राप्त आळंदीकर ह.भ.प. प्रमोदजी पानबुडे महाराज यांचे भव्य काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून श्रद्धावान भक्तांसाठी हा अध्यात्म, सेवा आणि आरोग्याचा सुंदर संगम ठरणार आहे.
स्थानिक नागरिकांनी व आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहण आयोजक जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य व नाभिक युवा क्रांती महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.


0 टिप्पण्या