Ticker

6/recent/ticker-posts

टि आर जी कंपणीने नागरिकांना लावला लाखो रुपयांचा चुना


 भद्रावती शहरात व तालुक्यातील तणावाचे वातावरण  


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील नागरिकांना T R G कंपनीने लिंकच बंद केल्याने नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा  TRG कंपनीवर फसवणुकीचे गंभीर आरोप होत असतानाच 26 नोव्हेंबर रात्री 12 वाजता कंपनीची लिंक पूर्णपणे बंद पडली. ॲप, वेबसाइट आणि सर्व सिस्टीम बंद झाल्याने नागरिक, युवक-युवती आणि महिलांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. रातोरात कनेक्शन बंद केल्याने TRG कंपनी फसवि असल्याचे स्पष्ट झाले असून, भद्रावतीत भीती आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून रिचार्ज, सिस्टम अपडेटिंग, विड्रॉल विलंब, सर्विस फी, बनावट RBI करार असे एकापेक्षा एक संशयास्पद प्रकार केल्यानंतर अखेर कंपनीने लिंकच गायब केली. कोणालाही पैसे मिळाले नाहीत. नागरिकांचे हजारो - लाखो रुपये अडकले असून लोक अक्षरशः हतबल झाले आहेत. नागरीकांच्या सांगण्यानुसार -
आधी फी, मग डिपॉझिट, मग विड्रॉल, मग 10 तासांची मुदत… आणि आता लिंकच बंद! हा सरळ सरळ मोठा घोटाळा आहे.
भद्रावतीत TRG ऑफिसवर नागरिकांनी धडक मोर्चा काढला असून कार्यालय संचालकांना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. 

भद्रावती शहरात व तालुक्यात पुरुषांपासून, विद्यार्थ्यांपासून ते महिलांपर्यंत अनेकांचे पैसे या स्कीममध्ये अडकले आहेत. लिंक बंद झाल्याने TRG चा संपूर्ण गोटा फरार झाला असल्याची भीती स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.सध्या भद्रावतीत तणावपूर्ण वातावरण असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या