Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा बस स्थानक येथे स्वच्छ,सुंदर मोहीम अंतर्गत टीम ने केले सर्वेक्षण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-भंडारा बस स्थानक येथे बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर  बस स्थानक या मोहीमे अंतर्गत नुकतेच तृतीय सर्वेक्षण करण्यात आले, तिसऱ्या सर्वेक्षण दरम्यान मा. श्री पलंगे ,(उपमहाव्यवस्थापक/प्रदेश) अमरावती आणि त्यांचे सोबत    श्री मो.सईद शेख( मुक्त पत्रकार)  श्री काशिनाथ ढोंमणे(पत्रकार)व प्रवासी मित्र म्हणूनश्री सुशील शेंडे समिती मध्ये हजर होते.l
सोबतच मा.यंत्र अभियंता श्री संदिप खवडे. श्रीमती शीतल शिरसाठ( विभागीय वाहतूक अधिकारी), श्री राकेश तलमले( विभागीय सांख्यिकी अधिकारी), श्री प्रवीण गोल्हर(विभागीय अधीक्षक(अप), रा.प.म. भंडारा, श्रीमती सारिका लिमजे ( आगार व्यवस्थापक)भंडारा ई. ही या प्रसंगी उपस्थित होते. रांगोळी व शोभिवंत झाडे ठेवून बस स्थानकाची शोभा वाढविण्यात आली.बस स्थानक कार्यालय येथे मान्यवरांचे फुलझाडे देवून स्वागत करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या