चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—हाळी-हंडरगुळी(ता.उदगीर)येथील सर्वात म्हत्वाचा व वर्दळीचा नांदेड- बिदर हा राज्यमार्ग आहे.पण याच मार्गाला खेटून अनेकांनी आपापली दुकाणदारी थाटली आहे.यामुळे हा मार्ग धोकादायक नरकमार्ग बनत चालला असून या ठिकाणी थाटलेली अवैध दुकाणदारी अन्यञ हटवावी. अशी मागणी जनतेतून होत आहे.
या मार्गावर अतिक्रमण स्वरुपात थाटलेल्या दुकाणामुळे तसेच कशा ही पध्दतीने उभ्या केलेल्या लहान, मोठ्या (जीप,कार,टेंम्पो,बाईक्स) गाड्यांमुळे रहदारीला व थांब्यावर एस.टी.बस उभा करायला अडथळा होताना नेहमीच दिसून येत आहे. आठवडी बाजार (रविवार) या रोजी तर येथील परिस्थिती खुपच गंभीर व धोक्याची बनते.कारण,या मार्गावर थाटलेल्या दुकाणदारीमुळे येथून ये- जा करणे महाकठीण असते.तसेच सतत वाहतूककोंडी पण होते.तसेच अधूनमधून किरकोळ अपघात होत असतात.हा मार्ग खुपच म्हत्वाचा व रहदारीचा आहे.तरीही या मार्गावर अवैध दुकाणदारी कुणाच्या मदतीने थाटलीय?हा एक संशोधनाचा विषय आहे.कारण,हा राज्यमार्ग असल्याने यावरुन रोज लाखो गाड्या धावतात. तसेच हाळी-हंडरगुळीची व्यापारी पेठ ही या रोडलगतच असल्यामुळे या मार्गावर अवैध दुकाणदारी स्टाॅल थाटणे ही बाब सुरक्षेच्या द्रष्टीने खुप खतरनाक आहे.तेंव्हा या मार्गावर भविष्यात एखादी अनिष्ट,दुर्देवी घटना घडण्याची संभावना आहे. तेंव्हा या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करावा.आणि ही दुकाणदारी अन्यञ हलवावी.अशी मागणी आहे.


0 टिप्पण्या