Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी परिसरातविकास कामाचा गाजावाज.!दर्जाचा वाजला बॅंण्डबाजा..!!



चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-केंद्र व राज्य शासनासह आमदार व खासदार यांच्या माध्यमातुन विकास कामांसाठी डायरेक्ट ग्रा.पं.च्या नावे लाखो,करोडो रुपये येऊ लागल्याने या भागातील बहूतांश गावाअंतर्गत फेव्हर ब्लाॅक व काॅंक्रीटचे रस्ते तसेच गटारी,शादीखाने,समाज मंदीर,सौर ऊर्जेवरील लाईट (बल्ब,फोकस इ.), समशान भुमी शेड,सुरक्षाभिंत आदी कामांचा मोठा गाजावाजा करुन ही कामे होत असल्याचे दिसते.
माञ,झालेल्या व होत असलेल्या कामांचा दर्जा कसा आहे?याकडे ना विरोधकांचे लक्ष आहे,ना सामाजिक संघटना,कार्यकर्त्यांचे आहे.तसेच सं. विभागाच्या एकाही अधिका-याने या परिसरातील गावाअंतर्गत झालेल्या व सध्या सुरु असलेल्या कामांचा दर्जा (गुणवत्ता) यंञाच्या साह्याने (क्वालिटी कंट्रोल मशीन) तपासली व योग्य ती कारवाई केली.असे पण ऐकण्यात आले नाही.यामुळे त्या,त्या खात्याचे संबंधित अधिकारी आणि ग्रा.पं.चे कारभारी यांची अर्थपुर्ण फ्रेंडशिप असण्याची शक्यता वाटते. म्हणुन विकास कामांचा फक्त मोठा गाजावाजा होताना आणि ती कामे अत्यंत बेकार दर्जाचे कामे होताना सर्व सामान्य जनतेला दिसते.परंतू संबंधित अधिका-याला दिसत नाही म्हणजेच ते अधिकारी आणि ग्रा.पं. चे सत्ताधारी यांच्यात नक्कीच लेण देण होत असावी.अशी शंका बोगस कामाकडे बघून अनेकांना येत आहे. हाळी व हंडरगुळी परिसरातील गावा अंतर्गत आजवर झालेले,आता होत असलेले कामे खरोखरचं एक नंबर, दर्जेदार होत आहेत का?याचा शोध घेतल्यावर अनेक गावातील विकास कामांचा बॅंण्डबाजा किती कोटींचा वाजला.याचा नक्कीच उलगडा होऊ शकतो.गरज आहे फक्त संबंधित अधिका-याच्या इमानदारीची.असे जाणकार जनतेत बोलले जात आहे.  केंद्र,राज्य शासनासह आमदार अन् खासदार यांचा मिळून कोट्यावधींचा निधी लोकसंख्येनुसार गावागावांना मिळत असल्याने हाळी-हंडरगुळी (ता.उदगीर) परिसरात गावकारभारी मी,आजवर विकासाची अमूक कामे केलोय.व सध्या तमूक कामे करतोय.  अशा प्रकारच्या बढाया मारताना दिसतात.प्रत्यक्षात माञ वास्तव जरा वेगळंच (बोगस कामाचे) चिञ स्पष्ट दाखवत आहे.यामुळे विकास कामा चा गाजावाजा आहे की विश्वासाने सत्तेवर बसविलेल्या गावक-यांची फसवणूक?काॅंक्रीटचे जुने असले तरीही चांगले असलेल्याच रोडवर नवीन फेव्हर ब्लाॅक रोड केला तर तो रोड किती दिवस टिकू शकतो?तसेच झालेल्या व सध्या होत असलेल्या कामांची गुणवत्ता तसेच शासनाच्या (एम.बी)नियमांनुसार कामे होतात का?हे न तपासताच कामाचे बील (रुपये) मंजुर कसे व का केले जाते?असे प्रश्न चर्चेत आहेत.
गावातील अनेकांचा असा आरोप आहे की,विकास कामाचा फक्त मोठा गाजावाजा आणि पब्लिसिटीच दिसते.कामाची गुणवत्ता दिसतंच नाही..
दर्जेदार व गुणवत्तापुर्ण विकास म्हंजे काय रे भाऊ . असे हाळी-हंडरगुळी परिसरातील सज्ञान मुलांसह समस्त मंडळी बोलू लागले आहेत.तेंव्हा या परिसरात आजवर झालेल्या तसेच सध्या होत असलेल्या कामांचा दर्जा संबंधित अधिका-याने इमानदारीने तपासला तर विकास कामांच्या नावा खाली सुरु असलेली बोगसगिरी  आणि करोडो रुपयांची लूट नक्कीच  उघडकीस येऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या