Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमात अडसर करणाऱ्या पतिची प्रियकरा कडुन हत्या


कोरपणा पोलीस स्टेशन मध्ये येत असलेल्या नारंडा येथील घटना


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती  : कोरपना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नारंडा येथे  प्रेम संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकरानी हत्या केल्याची घटना रविवार दिनांक १६ रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा येथिल एका नाल्याजवळ सायंकाळच्या सुमारास घडली.

 नितेश रामदास वाटेकर रा. नारडा असे मृतकाचे आहे. नितेश हा वनसडी येथे हेअर सलूनचे दुकान चालवीत होता. तो आपल्या दुचाकीने आपल्या स्वगावी नारंडा येथे अपडाऊन करायचा. रात्रीचे नऊ वाजून ही तो परत का आला नाही या विवंचनेत असताना.
याच दरम्यान गावातील काहींनी व्यक्तींनी नारंडा येथील खडक्या नाल्याजवळ दुचाकीसह नितेश पडून असल्याचे माहिती मिळताच  त्याचा भाऊ सतीश यांनी जाऊन पाहिले असता. त्याच्या डोक्याला गंभीर मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचं सांगितले. सन २०२२ पासून नितेश हा गडचांदूर येथे आपल्या पत्नी व मुलीसह किरायाणे राहत होता.याच दरम्यान बादल सोनी नामक व्यक्तीशी नितेशच्या पत्नीचे प्रेम संबंध जुळले होते अशी माहिती आहे.गणपती उत्सव दरम्यान यामुळेच नितेश आणि बादल यांच्यात वाद सुद्धा झाला होता. त्यावेळी बादलने नितेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नितेशची पत्नी साधना ही गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. त्यावेळी बादलनी माफी मागितल्याने व पुढे त्रास देऊ नको असे साधनाच्या भावाने समजवल्यानंतर वादावर पडदा पडला होता. कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून साधनाने तक्रार मागे घेतली होती.

१० वर्षांपूर्वी नितेशचे लग्न झाले होते, साधना व नितेश यांना ९ वर्षाची मुलगी आहे, या सुखी संसाराला ३ वर्षांपूर्वी बादल सोनीची वक्रदृष्टी लागली, बादल व साधनाचे प्रेमसंबंध जुळले, याची चाहूल नितेशला लागली होती.तो त्यामुळे दोघांपासून वैतागला होता, त्याने गडचांदूर सोडत नारंडा मध्ये रहायला आला, वनसडी येथे त्याने लहान सलूनचे दुकान लावत कूटुंबाचा गाडा चालवू लागला. मात्र बादल हा साधनाच्या प्रेमात वेडसर झाला होता. तो साधनाला भेटायला यायचा. तुझ्या पतीचा काटा काढावा लागेल कारण त्याच्यामुळे आपण भेटू शकत नाही, असे बादल साधना जवळ नेहमी म्हणत होता.१६ नोव्हेम्बर रोजी बादल व त्याचा मित्र दुचाकीने चौकात येऊन नितेशची वाट बघत होते, नितेश घरून निघतो कधी व घरी परत कधी येतो याची पूर्ण माहिती बादलला होती. चौकात दुचाकी लावून दोघे खडक्या नाल्याजवळील मार्गावर नितेशची वाट बघत होते, नितेश त्यांना दुचाकीने येताना दिसला, धावत्या दुचाकीवर अंधारात बादलने नितेशच्या डोक्यावर लहान हातोडीने वार केला, अचानक झालेल्या वाराने नितेश दुचाकीसह कोसळला. नितेश ला बादलने साधना व त्याचे फोटो दाखवीत आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, तुझ्यामुळे आम्ही एक होऊ शकत नाही.

नितेश जखमी अवस्थेत बादलला म्हणाला कि उद्या कुटुंबासह चर्चा करीत मी साधनाला सोडचिठ्ठी देतो, त्यानंतर तुम्ही काय ते करा, मात्र नितेश हा जखमी असल्याने बादलला वाटलं कि हा पोलिसात तक्रार देणार, त्यामुळे बादलने नितेशचा गळा आवळला, गळ्यातील हड्डी मोडल्याने नितेश गतप्राण झाला. मात्र आरोपी इतक्यावर थांबले नाही त्यांनी नितेश ला खांद्यावर घेत नाल्याजवळ येऊन टाकले. सदर घटना अपघात वाटावी यासाठी आरोपींनी पूर्ण प्रयत्न केला.

रात्री हि घटना गावात पसरली, सर्वाना हि घटना अपघात आहे असं वाटलं, कोरपना पोलिस निरीक्षक लता वाडीवे व त्यांच्या पोलीस चमूने घटनास्थळाची सखोल पाहणी केली, मोबाईल जवळ व मार्गावर काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात मृतकाचा गळा आवळला असल्याची माहिती प्राप्त होताच कोरपना पोलिसांनी बादल सोनी वय २२ वर्ष धंदा स्टॉईल कामे व त्याचा मित्र तुषार येनगंटीवारला वय १९ वर्ष धंदा लाईट फिटिंग दोघेही ग. गडचांदूर यांना अटक केली असून पोलिसांनी मृतकाचे पत्नी साधना वाटेकरला सुद्धा ताब्यात घेतले आहे, साधनाचा सुद्धा या प्रकरणी सहभाग असल्याचे आढळून आले आहे. साधना व बादलच्या प्रेम प्रकरणात पती नितेशचा बळी गेला मात्र यामध्ये ९ वर्षाची मुलगी पोरकी झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या