सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- नगरपरिषदे वातावरण ऐन थंडीत असुन सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील हळगाव येथे तळ ठोकून शहरासह तालुक्यातील आगामी निवडणुकीचा आढावा घेत नगरपरिषद. जिल्हा परिषद. पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असुन मास्टर स्टोक टाकण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे परिषदांच्या निवडणुकीत भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही इच्छुकांनी पसंती दिल्याचे चित्र आहे.
जामखेड नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद. पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी जातीने लक्ष केंद्रित केले आहे. शहरात नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागातुन नगरसेवक कशा प्रकारे निवडुन आणता येईल यांचा सखोल अभ्यास सुरू केला असून तशा प्रकारची यंत्रणा कामाला लावली आहे. विधानसभा निवडणुकीत जामखेड शहरातुन आमदार रोहित पवार यांना जवळपास तीन हजाराचे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे आगामी निवडणुकीतही तालुक्यात राष्ट्रवादीला पुरक वातावरण निर्माण होईल या आशेवर कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नगरपरिषद निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे बंड उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांना आवर घालण्याचे प्रयत्न करावे लागणार आहे. त्याअनुषंगाने आमदार रोहित पवार यांनीही आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेतली असून नवे चेहरे समोर आणले जाणार असल्याची शक्यता आहे
शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद असून आमदार रोहित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्याचे आव्हान राष्ट्रवादी समोर असणार आहे. मात्र उमेदवारी कधी जाहीर होणार यांचा सस्पेन्स कायम ठेवला आहे ऐनवेळी उमेदवारी जाहीर करुन बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार रोहित पवार यांनीही शहरात ताकद लावली त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीला संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते.आतापर्यंत साठ च्या वर नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्राधान्य दिले आहे. हे इच्छुक सर्वसामान्य असले तरी त्यांच्या माध्यमातून स्थानिक आघाड्या व नेत्यांच्या पॅनेलपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.


0 टिप्पण्या