चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई:- भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव युगपुरुष दिनदुबळ्याचे उद्धार करते ज्ञान पंडित प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2025 रोजी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून - कधी होतील भीमा तुझ्या भेटीसाठी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, कारण- तो लाल भिमाईचा, भारी लाखो हजारत, चंदना समान झिजला तो, साक्ष आहे संविधानात. क्रांतिकारी गीत सादर केले. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विष्णु शिंदे संगम काव्यधारा, कवी गायक संगम कासारे यांनी प्रकाशित केलेली पुस्तक भेट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक संगम कासारे, गायक उत्कर्ष शिंदे, गायक गौतम हराळ, गायक रवींद्र गमरे, गायक अजय शिंदे, गायक सदानंद मोरे अकोला, गायक भगवान कान्हा डे, गायक हार्दिक कासारे, गायक देवानंद जगताप, गायक धोंडीबा रोडे, गायक अनिल लेहणार, गायक अशोक निकाळजे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक संजय जामनिक, आर पी एफ पोलीस मुंबई सुनील धांडे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - आमदार प्रकाश गजभिये इत्यादी मोठ्या संख्येने समाज बांधव, गायक कलावंत उपस्थित होते.


0 टिप्पण्या