Ticker

6/recent/ticker-posts

*जामखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपने रचलेल्या राजकीय षडयंत्रामुळे माझा विश्वासघात :- सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपने रचलेल्या राजकीय षडयंत्रामुळे माझा विश्वासघात झाला आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केला.आंबेडकरी चळवळीत काम करतो म्हणून माझी उमेदवारी जाणीवपूर्वक नाकारण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बाहेरून आयात उमेदवाराला संधी देत माझ्यावर अन्याय केला, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
   आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित बैठक व पत्रकार परिषदेत बोलत होते.
       विकी सदाफुले पुढे म्हणाले की, मला एक जागेसाठी लढवावी.असे वाटत असताना, ऐनवेळी आयात उमेदवारास संधी देत मला डावलले .याचा बदला म्हणून शहरातून आमचे उत्तर मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रभागात कमळ फुलू न देण्याचा निर्धार मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपने राजकीय डावपेच रचत माझा अपमान केला आहे, याची किंमत पक्षाला चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.   प्रा. राम शिंदे यांच्यावर थेट नामोल्लेख करून सदाफुले म्हणाले की, आंबेडकरी चळवळीशी जोडलेलो असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. माझी उमेदवारी नाकारणे हा राजकीय सूडभावनेचा भाग आहे.
     जामखेड नगर परिषद निवडणुकीत  अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे घोषणा त्यांनी यावेळी केली.आता कमळ नको, जामखेडमध्ये भाजपला १२ ही प्रभागात मतदान होऊ देणार नाही, असा घणाघात सवाल त्यांनी उपस्थित केला.
     या आरोपांमुळे जामखेडच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत नव्या समीकरणांना सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या