Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करा -अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : मालेगाव बलात्कार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना चंद्रपूर जिल्हा कमिटीच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल सोमवारी दुपारी एका लेखी निवेदनातून करण्यात आली.
स्रियांना सुरक्षित वाटेल असे सामाजिक -सांस्कृतिक स्तरावर महिला धोरण आखने हिच काळाची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करताना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष संध्या दुबे, सचिव विद्या निब्रड,वर्षा सवार ,सुजाता भगत , अरुण भेलके राजेश पिंजरकर,शैलेश निब्रड , परशुराम तोडासे,कवडु ढोके,गजानन इंगलवार,व्हि .ए.सपाट अरुण भेलके आदिं उपस्थित होते.
 आरोपीवर तातडीने ठोस कारवाई झाली नाही तर चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा विद्या निब्रड यांनी दिला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या