Ticker

6/recent/ticker-posts

पाथरी तालुक्यात महसूल विभागाची धडक कार्यवाईअवैध रेती उत्खननावर छापा, तराफे जाळून नष्ट

अवैध रेती उत्खननाविरुद्ध कडक पावले उचला
 -- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी : जिल्ह्यात अवैध रेती उत्खननावर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई सुरू केली असून, पाथरी तालुक्यातील मौजे गौंडगाव येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावरील अवैध रेती उत्खननाची सामग्री जप्त करून नष्ट करण्यात आली.

ही कारवाई पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्री. धोपे, मंडळ अधिकारी श्री. बागुल, तलाठी श्री. साजिद, श्री. तायनक, कोतवाल श्री. चव्हाण यांच्या पथकाने केली. या छाप्यात अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे चार तराफे, पाईप, उपकरणे व अन्य साहित्य जाळून नष्ट करण्यात आले.

दरम्यान, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महसूल विभागाच्या या कारवाईचे कौतुक करत अधिकाऱ्यांना नियमित तपासण्या व सतत छापे टाकण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी इतर संबंधित विभागांनाही कारवाईत सक्रिय सहभागाची सूचना केली आहे, ज्यामुळे अनधिकृत उत्खननाचे जाळे पूर्णपणे नष्ट होईल. त्यांनी सांगितले की, अवैध उत्खनन व वाहतूक प्रभावीपणे थांबवावी. प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करावी, दोषींवर कठोर कारवाई करून दंडात्मक पावले उचलावीत.

दरम्यान, मौजे गुंज येथे अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आले.  सदर कारवाईमुळे अवैध रेती उत्खननकर्त्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या