चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे :-जिल्ह्यात Pediatric Cardiologist उपलब्ध नसल्याने लहान बालकांच्या 2D Echo तपासणीस मोठ्या अडचणी येत आहेत. या गंभीर विषयाबाबत आज मा. शिवसेना (शिंदे गट )जिल्हा प्रमुख धुळे मनोज भाऊ मोरे व जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अशपाक भाऊ मनियार व रितेश कासार तर्फे
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख (OSD) मा. मंगेश चिवटे सर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यांचे स्विय सहायक माउली सर उपस्थित होते
लहान बालकांच्या जीवाशी संबंधित या प्रश्नावर तातडीने सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा.
निष्पाप बालकांचे प्राण वाचवणे हेच आपले ध्येय.
यावेळी उपस्थित उदय चंदराना सर धनंजय पवार संतोष जाधव सर्व मुंबई तील वैद्यकीय टीम होती.


0 टिप्पण्या