चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नगरपरिषदेच्या पदावर निवडून आलेले प्रफुल चटकी यांनी अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र काल स्वीकारले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रममापत्र वितरण सोहळा पार पडला.
नुकत्याच पार पडलेल्या भद्रावती नगर परिषद निवडणुकीत जनतेने दिलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब करत काल प्रफुल चटकी यांना नगराध्यक्ष पदाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या क्षणाने भद्रावतीच्या राजकीय वाटचालीस नवे पर्व झाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
प्रमाणपत्र स्वीकारल्यानतर नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी शहरातील सर्व मतदारांचे आभार मानत जनतेने दिलेला विश्वास हि मोठी जबाबदारी असून भद्रावती शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असा निर्धार व्यक्त केला. शहरातील पाणीपुरवठा नागरी सुविधा स्वच्छ रस्ते विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत लोकाभिमुख प्रशासन देण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या