चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर  :-दि. 22 डिसेंबर २०२५  रोजी शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालय, हंडरगुळी ता. उदगीर जि.लातूर येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे पर्यवेक्षक (स्काऊट मास्टर ) सुगावे बालाजी हे होते. या क्रार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गणित तज्ञ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काबरा बालाप्रसाद हे होते यांनी विद्यार्थ्यांना जिवनामध्ये गणिताचे महत्व पटवून दिले व
गणिताचा सातत्याने सराव करावा असे त्यांनी सांगितले. तसेच प्रमुख वक्ते विद्यालयातील गणित विषयाचे  तुकाराम बगाडे व प्रमुख वक्त्या  सौ. बिरादार के. के यांनी विद्यार्थांना   राष्ट्रीय गणित दिन निमित्त गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी गोष्टी, गीत व कोड्याद्वारे समजावून सांगितले व सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यानी    गणिताचे सिंबॉल नृत्य, पाढे  सादर केले, तसेच भाषण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सय्यद आर. एम. व  सूत्रसंचालन सौ. येलाले के.व्ही आणि आभार प्रदर्शन सौ. गुडाप्पे आर एस. यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सौ. नारागुडे  के.पी,सौ. कनकुरे एम. एम, सौ. भंडारी एस. जी ,सौ. कुरुळेकर एस.एन, सौ.शेख ए. वाय, ( ग्रंथपाल ) विशाखा कांबळे,सौ. संगमवार एस.टी,नाटकरे बालाजी, कणसे व्ही. एस,  मोमीन ए. एस, जाधव आर. जी , मैलारे एम.टी, पाटील आर. एम, गायकवाड बी.ए, भोसले अभिजित, कासले वैभव, मळभागे शिवानंद, विनीत सुर्यवंशी, भोसले अरविंद, माधव वाघमारे, सर्व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, युवती उपस्थित होते