श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त निघाली शोभायात्रा!
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त काल सोमवार दि.८ डिसेंबरला दुपारी ५ वाजता शहरात भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते.निघालेल्या लक्षवेधक शोभायात्राने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले
सदरहु शोभायात्रा ही हनुमान मंदिर ते जटपूरा गेट ,गिरणार चौक, गांधी चौक,पठाणपूरा मार्ग ते हनुमान देवस्थान अशी होती.आयोजित शोभायात्रेत तैलीक समाजबांधव मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.
सदरहु शोभायात्रा बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती.रस्त्यात ठिक ठिकाणी सामाजिक संघटनांच्या वतीने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान काल सकाळीच अनेक सामाजिक कार्यकर्ते व व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गावर शोभा यात्रेच्या स्वागतासाठी "स्वागत कमानी" उभारल्या होत्या. शनिवार दि.६ डिसेंबर पासून शहरातील हनुमान मंदिरात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..


0 टिप्पण्या