Ticker

6/recent/ticker-posts

हाळी ते चाकुर रोडवरील मौत का खड्डा बोलतोय हद्दीची भाषा !!सहकारमंञी लक्ष देतील अशी जनतेला वाटते आशा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—प्रधानमंञी ग्राम सडक योजना व मुख्यमंञी ग्राम सडक योजना या नावाने केंद्र व राज्य शासन रस्ते कामांसाठी करोडो रुपये खर्च करुन खेड्यांना शहराला व मोठमोठ्या बाजारपेठेंना जोडून दळणवळणा करीता उपाय योजना करताना दिसून येते.
माञ,उदगीर तालुक्यातील हाळीहून चाकुर जाणा-या रोडची झालेली दुरावस्था बघता शासनाची सडक योजना कुचकामी ठरली.असे म्हणणे चुक ठरणार नाही.
कारण,हाळीहून नागदरवाडी, बोरगाव मार्गे चाकुर,लातुर जाणारा हा रोड खड्ड्यांचा बनला आहे.तर बंदईच्या होळावरच्या पुलावर गत पावसाळ्यात १ भलामोठा खड्डा पडला असून या खड्ड्यांची तसेच रोडची दुरुस्ती सा.बां.विभाग चाकुर यांनी करायची का,उदगीरवाल्यांनी. अशा संभ्रमावस्थेत व हद्दीत या रोड ची वाट लागली आहे.हा रोड चाकुर, लातुर जाणारा शाॅर्टकट असल्याने व आजुबाजुला शेती असल्याने यावरुन रोज हजारो वाहने धावतात.तसेच ऊस वाहतूक करणारे वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने जीवघेणा अपघात होण्याची शक्यता आहे.
या रोडवर १ रुद्रवाडी वगळता अन्य गावे अहमदपुर-चाकुर विधानसभा मतदारसंघात येतात.आणि सहकार मंञी बाबासाहेब पाटील हे आमदार आहेत.व मंञीमहोदय हद्दीची भाषा बोलणारा हा खड्डा व रोड नक्कीच दुरुस्त करवून घेतील.अशी आशा जनतेला व वाहनधारकांना वाटते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या