Ticker

6/recent/ticker-posts

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी नंदूरबार जिल्हा पोलीस प्रशासनविरोधात सुशिलकुमार पावरा यांचे ५०८ वे उपोषण!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :- नंदूरबार जिल्हा  पोलीस प्रशासन विरोधात विविध  मागण्यांसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ५०८ वे उपोषण होणार आहे.उपोषणाचे निवेदन सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिले यांना आहे.
               निवेदनात म्हटले आहे की,     जिल्हातील पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात,अवैद्य धंदे बंद करणे ,मनमानी कारभारासंबंधीत  मागण्यांसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना, आदिवासी समाज  जिल्हा नंदूरबार तर्फे दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नवापूर चौफूली  ते मा. पोलीस अधिक्षक कार्यालय नंदुरबार पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.परंतू पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी एकाही मागण्यांवर अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. ही फार मोठी दुरदैवाची बाब आहे.
                           पोलीस कस्टडीत मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुष पणे मारहाण करणा-या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे,गुन्हे अन्वेषण विभाग नंदूरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर ॲस्ट्रासिटी, अमानुष पणे मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदांचा दुरूपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा. वादग्रस्त,आरोपीत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा. 
                      आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातील लाॅकअपमध्ये बंद करणे,डांबून ठेवणे ,आदिवासी व्यक्तींची ,आदिवासी महिलांची तक्रार न घेणे तसेच आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा ३५४ चा गुन्हा दाखल करतो,अशी धमकी आदिवासी समाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांनी दिल्याप्रकरणी निलेश देसले यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा,दिनांक ४/४/२०२५ रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे  सेवेतून निलंबित करा ,पदावरून हटवा,नंदूरबार जिल्हाबाहेर बदली करा.
                 शहादा पोलीस ठाण्यात ड्यूटीवर असतांना विमल गुटखा खाणा-या पोलिसांची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित करा.नंदुरबार जिल्ह्य़ातील सट्टा- मटका,जुगार, दारू,गुरखा,गांजा,असे अवैद्य व्यवसाय बंद करा.तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेणाऱ्या धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा.  आदिवासी संघटनांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे मागणी केलेल्या ,परंतू पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आरोपींना वाचविण्यासाठी दुर्लक्ष केलेल्या अवैद्य व्यवसाय व विषयांवर तात्काळ कारवाई करा.इत्यादी मागण्यांसाठी सुशिलकुमार पावरा हे उपोषण करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या