Ticker

6/recent/ticker-posts

केसुला बहुउद्देशीय संस्थे तर्फे दर्पण दिना निमित्य पत्रकारांचा सन्मान !

पत्रकारांच्या लेखणीमुळेच जनसामान्यांना न्याय मिळतो – प्रफुल जाधव  

चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर- पत्रकारांच्या लेखणीमुळेच जनतेच्या समस्या अडचणी सुटून जनसामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन बहुउद्देशीय संस्था ईवळेश्वरचे अध्यक्ष प्रफुल जाधव यांनी केले. 
६ जानेवारी दर्पण दिना निमित्य केसुला बहुउद्देशीय संस्था ईवळेश्वरचे अध्यक्ष प्रफुल जाधव यांनी  सत्कार सोहळा आयोजित करून माहूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा कलम व भेट वस्तू देऊन सन्मान केला. दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ :०० वा.  माहूर शहरातील  कपिलेश्वर धर्मशाळेत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे  हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अभामप चे जिल्हा का. सदस्य जयकुमार अडकीने, अभामपचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी, व्हाईस ऑफ मिडियाचे विजय आमले. प्रा. प्रवीण बिरादार, साजिद खान यांची उपस्थिती होती.  पुढे बोलतांना  प्रफुल जाधव म्हणाले की अधिकार पदावर असलेली  व दबदबा  असलेली एखादी प्रशासनातील व्यक्ती किंवा पुढारी जेव्हा अधिकारांचा दुरुपयोग करतात तेव्हा त्यांना वठणीवर आणण्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय पुढारी केवळ निवडणुका जिंकण्यापुरते  कानाला गोड वाटणारे शब्द बोलत असतात वेळेच्या सोयीनुसार वर्तन करतांना दिसतात मात्र पत्रकार हा २४ तास सजग राहून जन सेवा एक जन सेवा करत असल्याने पत्रकारांचे समाजावर खूप मोठे ऋण आहे. त्यामुळेच पत्रकारांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने सदर सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे निक्षून सांगितले. 
     यावेळी राज ठाकूर, मनोज कीर्तने, अपील बेलखोडे,  नितेश बनसोडे, दत्ता शेरेकर, विश्वास पंडागळे, संजय सोनटक्के, सचिन बेहेरे, प्रा. विनोद कांबळे, संजय बनसोडे, अनिल माडपेलीवार, पद्मा गिऱ्हे, सुरेखा तळणकर, राजिक शेख, राजू दराडे आदीसह  शेकडो पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राठोड कुणाल राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन यादव आडे उपसरपंच मच्छिंद्र पार्डी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या