चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-राज्यासह देशातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये बदलत्या रंगारुपानुसार बदलल्याचे, हायटेक झाल्याचे दिसते.
माञ,उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात एकमेव असलेले वाढवणा बु.येथील पोलिस ठाणे आजही तसेच आहे जसे निजाम काळात होते दगड,धोंड्याचे तसे!!
म्हणुन या ठाण्याच्या आवारात मोकाट गुरांचा सतत मुक्तसंचार,गोंगाट असतो.हातातील काम सोडून गुरांना हाकलावे लागते.असे पोलिसांत बोलले जाते.
तेंव्हा हे ठाणे हायटेक कधी होणार?याकडे पोलिसांसह ४२ गावच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
आधुनिकीकरण,हायटेक हा सध्या सर्वञ चर्चीला जाणारा म्हत्वाचा विषय.
तसा हा विषय पोलिस खात्यातही चर्चेत असतो.
आणि तशी फक्त चर्चाच वाढवणा पोलिसांत आहे.
कारण,कधीकाळी वाढवणा ठाण्याच्या हद्दी मध्ये बीट तथा चौकी असलेल्या जळकोट येथे आज सुसज्ज,अद्यायवत असे पोलिस ठाणे झाले.आणि वाढवणचे ठाणे आजही निजामकालीन बांधकाम असलेले दगड,धोंड्यातच उभे आहे.
आणि याला लोकप्रतिनीधी मधील उदासीनता कारणी भुत आहे.असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.
कारण,जग चंद्रावर गेले. अशी भाषणबाजी करणारे राजकीय पुढारी वाढवणचे ठाणे हायटेक करण्यासाठी लक्ष का घालत नाहीत?हा प्रश्न ठाण्याच्या हद्दीतील ४२ गावच्या जाणकारात चर्चीला जातोय.
सद्यस्थितीत पोलीस दलात आधुनिक हत्यारे,वाहने तसेच सुसज्ज इमारत,कॅमेरे व कालानुरुप प्रशिक्षण आदी गोष्टीआधुनिकीरणात दिसतात.राज्यात यासाठीचे बरीचशी कामे विविध पोलिस ठाण्यात झाल्याचे दिसतात.आणि हे सर्वकांही जनहितासाठी व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी,म्हणुन उप्लब्ध करुन दिले जाते.
परंतू,उदगीर तालुक्यातील वाढवणा बु.पोलिस स्टेशन संदर्भात आधुनिकीकरण, हायटेक,सुसज्ज ही बाब "फेल" ठरली.असेच म्हणावे लागेल. कारण,३०वर्षापुर्वी वाढवणा ठाण्याचा बीट असलेले जळकोट येथे आज चांगली इमारत झाली आणि वाढवणची इमारत माञ शेकडो वर्षापुर्वी निजामकाळात जशी दगड, धोंड्यात बांधली आहे, तशीच्या तशी उभी आहे.
हां,अधुन-मधून रंगरांगोटी व डागडूजी करतात.ही बाब वेगळी.माञ,जिल्ह्यातले सगळी ठाणे आजच्या युगानुसार सुपर हायटेक, अत्याधुनिक बनल्याचे दिसते.माञ,४२ गावातील लाखो लोकांच्या रक्षणासाठी दक्ष असलेल्या वाढवणा ठाण्याची इमारत अत्याधुनिक,हायटेक कधी होणार?लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का?तसेच येथील
पोलिस ठाणे व वसाहत हे अत्याधुनिक,चांगल्या सोयी सुविधांनियुक्तच असायला पाहीजे.ही काळाची गरज आहे.याबरोबरच ठाण्याच्या ताब्यात असलेली सगळी जमीन(जागा)पोलीस दलाच्या नावे होणे हे ही तितकेच म्हत्वाचे आहे.तेंव्हा हा अत्यंत म्हत्वाचा विषय मार्गी लावणार कोण व कधी?याकडे जनतेसह पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या