साकोली:- रवि भोंगाने
साकोली-सेंदूरवाफा नगर परिषदचे वरिष्ठ लिपिक आनंद रंगारी यांना नियतमानाप्रमाणे वयाच्या ५८ व्या वर्षी नगरपरिषद प्रशासनातर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषद असा त्यांच्या शासकीय प्रवास राहिलेला आहे. सेवानिवृत्त आनंद रंगारी यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वाजत गाजत रॅली काढून त्यांच्या गणेश वार्ड निवासस्थानापर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने निरोप दिला.
३१ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता नगरपरिषेच्या सभागृहात पार पडलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकोली-सेंदूरवाफा नगर परिषदेचे मुख्यधिकारी मंगेश वासेकर, प्रमुख मान्यवर म्हणून नगराध्यक्षा देवश्री मनिष कापगते, प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे, माजी उपाध्यक्ष जगन उईके, स्वीकृत सदस्य अँड. दिलीप कातोरे, स्थानिक नगर परिषदेचे नगरसेवक / नगरसेविका स्मिता श्रीधर सीडाम, वैशाली लांजेवार, त्रिवेणी चौधरी, प्रीती डोंगरवार, मेघा बडवाईक, सायली दोनोडे, रेणू गणवीर, निर्मला नंदेश्वर, मीना लांजेवार, पुष्कर करंजेकर, राजकुमार पोगळे, कृणाल राऊत, पंकज मुगुलमारे, संदीप बावनकुळे, प्रमोद गजभिये, किशोर पोगडे, नयन पटेल, सपन कापगते, नितीन खेडीकर, सत्कार मूर्ती आनंद रंगारी, प्रशासकीय अधिकारी राजेशसिंह परमार, प्रशासकीय अधिकारी कल्याणी भवरे, गुंजन फेंडर, संतोष दोतूलवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी, साकोली नगरपरिषद कर्मचारी वृंद, साकोली- सेंदुरवाफा नगरसेवक यांच्या वतीने आनंद रंगारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष देवश्री कापगते, उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे, माजी उपाध्यक्ष जगन उईके, स्वीकृत सदस्य अँड. दिलीप कातोरे, राजेशसिंह परमार आदींसह इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. ज्यांच्या कार्यकाळात आनंद रंगारी यांनी सेवा दिली ते मुख्यधिकारी मंगेश वासेकर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आनंद रंगारी यांच्या विशेष कार्याचा गौरव करतांना मला आनंद होत आहे. शांत, संयमी आणि आपल्या कामात तत्परता हे त्यांचे विशेष गुण होते. ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषद असा त्यांचा शासकीय प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यांच्या या अनुभवामुळे आम्हाला नगर परिषदेची फेररचना करण्यास फार मोठे सहकार्य लाभले. यापुढेही त्यांचे आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यांनाही कुठलेही सहकार्य लागले तर आम्ही नक्कीच सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले. स्वीकृत सदस्य अँड. दिलीप कातोरे यांनी आनंद रंगारी आणि मी एकाच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी राहिलेले आहोत. त्यामुळे त्यांचा माझा बालपणापासून परिचय आहे. परिश्रम, कष्ट आणि अत्यंत बिकट परिस्थितीतून त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली. एकाच शाळेत शिकलेल्या बालपणी मित्राच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आनंद रंगारी यांच्या कार्याचा गुण गौरव केला. सत्कार कार्यक्रमाला उत्तर देतांना आनंद रंगारी म्हणाले की, कुठल्याही शासकीय सेवेत कार्यरत असतांना सहकारी कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक असते. ते मला आतापर्यंतच्या प्रवासात मिळाले. सेवेत कार्यरत असतांना एकमेकांना सांभाळून घ्यावे लागते. ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषद या तिन्ही प्रवासात नागरिकांबरोबरच माझ्या सहकाऱ्यांचे मला नेहमीच सहकार्य लाभले. त्यांच्यामुळे हा सेवानिवृत्तीचा टप्पा आनंदाने पार पाडता आला. या प्रवासात ज्यांचे मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान, सहकार्य राहिले आहे त्यांचा मी सदैव ऋणी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी कल्याणी भवरे, संचालन जीवन लांजेवार तर आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी संतोष दोन्तूलवार यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर समन्वयक मिलिंद गजापुरे, विविध विभागातील स्थानिक न.प.चे लिपिक प्रकाश गेडाम, सचिन डोमळे, कैलास राऊत, डोमा निंबेकर, शिपाई रामगोपाल सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या