Ticker

6/recent/ticker-posts

रेतीची ची चोरटी वाहतूक:१ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह फरार


स्थानिक गुन्हे शाखा भंडारा उपविभाग साकोली पथकातील पोलिसांची मुरमाडी(तूप.)येथे कारवाई

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील  चूलबंद नदीच्या भूगाव परिसरातील पात्रातून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ३ आरोपीवर गुन्हा दाखल करून १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह १ ब्रास वाळू पालांदूर पोलिसांकडून जप्त करण्यात आला असून यातील १ ट्रॅक्टर चालक-मालक विना क्रमांकाच्या ट्रॉली सह गर्दीचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ट्रॅक्टर घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील साकोली उपविभागाचे कर्मचारी पोलीस  ठाणे पालांदूर हद्दीतील मुरमाडी
(तूप.) परिसरात दि.३१मार्च २०२६ रोजी सकाळच्या सुमारास गस्तीवर असताना सकाळी १० वा.दरम्यान मुरमाडी(तुप.)येथील खुशाल कोरे यांच्या दुकाना समोरील रस्त्यावर सदरची कारवाई करण्यात आली. फिर्यादी पो. हवा. सुनील शामराव ठवकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चूलबंद नदीपात्रातून अवैधपणे रेती या
गौण खनिजाची विना परवाना विना पास चोरटी वाहतूक केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी पालांदूर पोलिसांनी एक स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३६ ए.जी ७८५२ व एक लाल  रंगाची ट्रॉली विना क्रमांकाची ट्रॉली व गौण खनिज रेती १ ब्रास असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई सूरू असताना दरम्यान
लाल रंगाचा महीन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH.35AR.0593 व लाल रंगाची ट्राली विना क्रमांकाची चे टूक्टर ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास रेती भरलेली तसेच लाल रंगाचा महीन्द्रा 415 XP Plus कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH.36AG.7852 व लाल रंगाची ट्राली विना क्रमांकाची ट्रक्टर ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास रेती  अवैध रेतीची चोरी करुन वाहतूक करतांना मिळून आल्याने जप्ती पत्रकाप्रमाणे पंचासमक्ष जप्ती कारवाई करीत असतांना समोरच भागवत सप्ताहाची दिंडीची फेरी जाण्याकरीता दोन्ही ट्रक्टर बाजुला करीत असतांना ट्रॅक्टर क्रमांक MH.35AR.0593 चा चालक नामे दिलीप सदाषिव तरोणे रा. सोनमाळा याने आपल्या ताब्यातील रेतीने भरलेला ट्रक्टर समोरुन वळवत
असतांनाच पळवून नेवून फरार झाला घटनास्थळावर असलेला ट्रॅक्टर क्रमांक MH.36AG.7852 व लाल रंगाची ट्राली विना क्रमांकाची चे ट्रक्टर ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास रेती  आरोपी नामे रोहीत रमेश सुरजोशी वय 19 वर्षे रा. मेंढा/भुगाव यांचेकडुन जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त केला.

  या प्रकरणी पालांदूर पोलिसांनी अप.क्र.८३/२०२६ कलम
३०५ (ई)३(५)भान्यास अन्वये
१.रोहित रमेश सुरजोषी,
(वय १९ वर्ष) रा.मेंढा(भूगाव),
२.प्रणित संजय हिंगे
(वय २२वर्ष)
रा.सालेबर्डी ता.साकोली
व फरार ट्रॅक्टरचा चालक-मालक दीपक सदाशिव तरोणे (वय ४३वर्ष)रा.सोनमाळा ता. लाखनी या तिघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक सतिश बन्सोड यांच्या मार्गदर्शनात सूरू आहे.

लाल रंगाचा महीन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH.35AR.0593 व लाल रंगाची ट्राली विना क्रमांकाची चे टूक्टर ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास रेती भरलेली  ट्रॅक्टर फरार झाला होता. ट्रॅक्टरचा चालक-मालक दीपक सदाशिव तरोणे सोनमाळा ता. लाखनी याच्यावर गुन्हा दाखल झाला असुन आज दि.१ एप्रिल दुपारी २ :४० वृत्त लिहे येईपर्यंत फरार आहे. आता परिसरात जनतेचे लक्ष पांलादुर पोलिस स्टेशनच्या कारवाई कडे लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या