व्हॉईस ऑफ मीडिया नवनियुक्त पदधिकाऱ्यांचा गौरव
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील चुका असतील तर त्यातील सत्यता समोर आणून समाजा समोर ठेवावे. जेणेकरून कोणताही विभाग खडबडून जागा होऊन आपली चूक दुरुस्त करेल आणि समाजहिताचे कार्य करेल. पत्रकारांनी सत्यता समोर आणून निपक्ष:पातीपणे लिहावे असे प्रतिपादन साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषदच्या नगराध्यक्ष देवश्री कापगते यांनी केले. त्या साकोली नगरपरिषद सभागृहात व्ही.आय.पी. ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षीय पाहुण्या म्हणून बोलत होत्या. साकोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रम सोहळ्याच्या मंचावर नगराध्यक्ष देवश्री कापगते, प्रमुख अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे, नगरसेविका स्मिता सिडाम, पत्रकार डी. जी. रंगारी, माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते प्रामुख्याने उपस्थित होते. व्ही.आय.पी. ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साकोली तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला. या सत्कारमूर्तीत नवनियुक्त साकोली ता.अध्यक्ष आशिष चेडगे, उपाध्यक्ष रवि भोंगाने, सचिव किशोर रंगारी, सहसचिव शाहेद कुरैशी, कोषाध्यक्ष मनिषा काशिवार, सदस्य ऋग्वेद येवले, राशिद कुरैशी, किशोर बावणे, अयुब खान, सुनिल जगिया, ताराचंद कापगते, यशवंत कापगते, जिल्हा कार्यकारिणीचे डी. जी. रंगारी, सदस्यगण किशोर गडकरी, लाखनीचे मदन कमाने तसेच नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी सुरेश मेश्राम यांचा समावेश होता. याप्रसंगी व्ही.एस.एफ. समुहातर्फे सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. हरीशचंद्र सोनवाने, प्रास्ताविक लाखांदूर न्यायालयाचे रणधीर कापगते आभार अनिल कापगते यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही.आय.पी. ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अनिल कापगते, अंकीत कापगते, प्रविण कांबळे, चंद्रशेखर कापगते, संतोष नारनवरे, गणेश बोरकर, महेश पोगळे, मुकेश पंचभाई, मनिष झिंगरे, रूपचंद कापगते, सिताराम मौजे, दिगंबर सुर्यवंशी व संपूर्ण व्ही एस एफ समुह साकोली सेंदूरवाफा शहर यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या