Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन २१ वर्षीय नराधमाचा अत्याचार



•लाखनी पोलीस स्टेशन येथील घटना

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:- लाखनी येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील मौजा इंम्पेरीयल ब्ल्यू कॅफे गडेगाव या घटनास्थळी पिडीत अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष ९ महिने या मुलीला मुलीचा नातेवाईक असलेले आरोपी वंश दिपक हुमणे वय २१ वर्ष रा. लोकमान्यनगर (भिमनगर) नागपुर ता.जि. नागपुर याने लग्नाचे आमिष देऊन आरोपीने पिडिते सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवुन लैंगिक अत्याचार करून दोन महिन्यांची गर्भवती केली. त्यानंतर दोन महिन्यांपासून पिडितेला मासीक पाळी न आल्याने व पिडितेच्या पोटात दुखत असल्याने आईने पिडित मुलीला उपचारा करीता खासगी दवाखाना येथे घेवुन गेले असता नमुद पिडिता हि दोन महिन्याची गर्भवती असल्याचे पिडितेच्या आईला वैद्यकीय अधिकारी सिद्धीविनायक हॉस्पीटल लाखनी यांनी सांगीतले असे याबाबत पिडितेने पो.निरीक्षक सुभाष बारसे पोलीस स्टेशन लाखनी यांना दिलेल्या बयानात सांगीतल्यावरून तसेच वैद्यकिय अधिकारी यांचे अहवालावरून आरोपी वंश दिपक हुमणे वय २१ वर्ष रा. लोकमान्यनगर (भिमनगर) नागपुर ता.जि. नागपुर यांच्यावर लाखनी पोलीस स्टेशन येथे अप क्र. - २४४/२०२६ कलम ६४(१) भान्यासं. सहकलम ४, ६ पोक्सो द्वारे पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस नागपूर येथून अटक करण्यात आली यावेळी पो.निरीक्षक सुभाष बारसे पोलीस स्टेशन लाखनी, पो.हवा. अमितेश वडेटवार, पो.शि. प्रशांत धकाते हे घटनेचा तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या