चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा, : महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता १२वी (H.S.C.) परीक्षेचा 2025–26 चा निकाल शनिवार, २ मे रोजी जाहीर झाला. या निकालात मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू ज्युनिअर कॉलेज, नगर परिषद भंडारा यांचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. यावर्षी इकरा झकरिया खत्री हिने 84.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. झोया मुश्ताक शेख हिने 73.67% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर मसीरा सलीम शेख हिने 70.83% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, प्रशासन अधिकारी प्रगती वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक अज़ीज़ अहमद, मुश्ताक शेख तसेच सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या