शेतकरी आधीच मेला,दिसते ते प्रेत आहे.
महाराष्ट्र राज्यातील २८८ आमदार पैकी कोणीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून आंदोलन केले नाही.पैकी २३२ तर सत्तेत बसून गाजर खात आहेत.बाकी विरोधातील अजूनही सत्ता गेल्याचे दुःख विसरले नाहीत.पण बच्चू कडू निवडणूक हारल्यानंतर ही लढले.पदयात्रा , उपोषण आणि रस्ता रोको केला.कर्जमाफीचा करार करवून घेतला.हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.पुसून काढता येणार नाही.
आम्ही अमरावती आणि नागपूर च्या आंदोलनात सहभागी होतो.तेथे भाजपचे आमदार का आले नाहीत?कांग्रेस चे आमदार का आले नाहीत?तेथे शिवसेनेचे आमदार का आले नाहीत?तेथे राष्ट्रवादीचे आमदार का आले नाहीत?कसली लाज वाटत होती? हरामखोर! म्हणे ,आम्ही राष्ट्रीय पक्षांचे आमदार आहोत.आम्ही सत्तेतील आमदार आहोत.या निवडणूक हारलेल्या माणसाला साथ दिली तर कमीपणा वाटला असेल.काहींचे मन खात असेल कि,हे आंदोलन आपण केले असते तर बरे झाले असते.पण ही सुबुद्धी वेळेवर आली नाही.का आली नाही? कदाचित तसा विचार कधी केलाच नसेल.कि आपण शेतकऱ्यांच्या मतांनी निवडून आलो आहोत तर हिच वेळ आहे उपकार फेडण्याची.
बच्चू कडू शिवसेनेत गेले काय आणि आले काय, शेतकऱ्यांना नाही पण राजकीय वात्रटिका करणाऱ्यांना जास्त खटकले.जे आमदार खासदार मंत्री नाहीत ते टिका करतीलच.पण जे आमदार खासदार मंत्री आहेत त्यांनी तर टिका न करता कपभर पाण्यात जीव दिला पाहिजे.तुम्ही काय कामाचे रे,लांडगे,कोल्हे,बिवटे?
माझ्या जळगाव जिल्ह्यात अकरा आमदार आहेत.एकाहून एक सुजलेला आणि माजलेला.बारावा विधानपरिषदेचा आहे.दोन आत्याबाई खासदार आहेत.दहा तर माजी आमदार खासदार जिवंत आहेत.एकालाही शेतकऱ्यांचे सोयरसुतक नाही.उलट हेच शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गांव हे पाडळसरे धरणामुळे शंभर टक्के बुडित आहे.या गावातील १५५ कुटुंबांचे पुनर्वसन तब्बल २६ वर्षांपासून रखडले आहे.दस्तुरखुद अमळनेर चा आमदार अनिल पाटील यांनी अडवले आहे.कशासाठी ? जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसनचा बेकायदेशीर लाभ घेण्यासाठी.त्यासाठीच १५५ कुटुंबांचे पुनर्वसन लेखी पत्र कलेक्टरला देऊन अडवून ठेवलेले आहे.म्हणे,मी भुमि पुत्र!हा तर भुमिपुत्रांचा शत्रू आहे.
सहा महिन्यांपासून आम्ही आमदार खासदार मंत्री नसतांना पुनर्वसनासाठी लढत आहोत.उपोषण केले.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घरी जाऊन भेटले.या माणसाने काहीच मदत केली नाही.सात्री गावात गेला नाही.परिस्थिती पाहिली नाही.पण मुंबईत मोर्चा काढायला गेला.जळगांवला नाचायला गेला.पण सात्रीला गेलाच नाही.बाकीचे धंदे येथे लिहीत नाही.
एकनाथ खडसेंनी हे पाडळसरे धरण मंत्री असताना मंजूर केले होते.त्यांना जाऊन भेटलो.मदत मागितली.भाऊ,दादा,काका,मामा, साहेब म्हटले.पण पाझर फुटला नाही.
गुलाबराव पाटील पालकमंत्री असूनही जबाबदारी घेत नाहीत.नाचगाणे, तमाशा,जलसा करून लोकांना खुष करतात.म्हणे आम्ही एकमेकांच्या मतदारसंघात हात घालत नाही.वा रे! पालकमंत्री!हा तर चंबळच्या डाकूंचा सिरस्ता होता.
याच कामासाठी आम्ही सहा आजी माजी आमदारांना भेटलो.पण संवेदनाशून्य!
याच कामासाठी बेवडा मंत्री मकरंद पाटील यांना भेटलो.ते म्हणे,तुमचे काम करतो पण अनिल पाटील च्या ताटात पाहू नका.आता मंत्री मकरंद पाटील.चांगले बक्कळ मानधन घेतात.कशासाठी?खाण्या पिण्यासाठी कि पुनर्वसन स्थळी भेट देण्यासाठी?कमाल आहे!
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंबई मंत्रालयात जाऊन भेटलो.त्यांनी कलेक्टर ला फोन तर केला.पण काय सांगितले ते आम्हाला सांगितलेच नाही.फुकट काम करू नका!असे तर सांगितले नसेल? बावनकुळे कोणतेही काम फुकट करीत नाहीत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ६ जानेवारीला जळगाव ला आले.हा भाऊ मुख्यमंत्री असताना जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार करीत होता.तेंव्हाच आमचे जी एस ग्राऊंडवर उपोषण चालू होते.या माणसाने ढुंकूनही पाहिले नाही.साधी विचारपूस केली नाही.फडणवीस ने मानधन सरकार चे उपटले आणि प्रचार भाजपचा केला.कर्तव्यशून्य माणूस.निर्दयी माणूस.महाराष्ट्राला शाप आहे.
एकनाथ शिंदे.यांनी कालच बच्चू कडू गिळला.जसा सापाने बेडूक गिळला.हे रात्री बेरात्री जळगाव जिल्ह्यात येतात.पेहराव बदलून.पण दिवसा सात्री गावाला भेट दिली नाही.हे आमदार किशोर पाटील यांनी त्यांना शुद्धीवर असतांना सुचवले पाहिजे.
असे आमदार,असे खासदार,असे मंत्री महाराष्ट्रात आहेत.नालायक आहेत.चोर आहेत.हरामखोर आहेत.यांनी चोऱ्या केल्या.गब्बर झाले.त्यातून म्हणजे चोरलेल्या पैशातून शेतकऱ्यांना मंडप टाकून खिचडी,दारू,मटण खाऊ घालतात.यामुळेच शेतकरी लाचार,लिंपीत झाला आहे.मताचे रोख पैसे देतात.बायकोला पंधराशे देतात.त्यामुळे तर शेतकरी नैतिक दृष्ट्या पार मेला आहे.आता जे फिरते,रडते,दिसते ते शेतकऱ्यांचे कलेवर आहे.शेतकरी आधीच मेला आहे.दिसते ते प्रेत आहे.
.... शिवराम पाटील
प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष जळगाव..
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
३/५/२०२६


0 टिप्पण्या