विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची कर्मभूमी आणि सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या सहवास लाभलेल्या* मुंबईतील सायन कोळीवाडा तालुक्यामध्ये बौध्द धम्माची पहिली पायरी आणि बौध्द धम्मदीक्षा प्रक्रिया असणाऱ्या *'श्रामणेर प्रवज्जा शिबीर'* पहिल्यांदा आयोजित होऊन इतिहास रचला.
सायन कोळीवाडा तालुक्यामध्ये दरवर्षी जगामध्ये शांतीचा संदेश पोहचण्याच्या दृष्टीकोनातून वैशाखी बुध्द पौर्णिमा निमित्ताने पहाटे धम्म प्रभात रॅली काढली जात असे.
परंतु, वर्ष २०२५ मध्ये स्थानिक केंद्रस्थानी असलेल्या भिक्खु निवासाचे नुतनीकरण करून नागवंश बुध्द विहार नामकरण करण्यात आले. तरी बौध्द धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोणतेही उपक्रम न आखल्याने वर्ष २०२६ मधील सायन कोळीवाडा तालुक्याच्या इतिहासातील पहिले श्रामणेर प्रवज्जा शिबीर आयोजित करण्यात आले होते.
ह्यासाठी प्रामुख्याने भिमसैनिक संघटनाचे प्रमुख सल्लागार आणि प्रज्ञाज्योती सोशल फाऊंडेशन चे संचालक आयु. जितेंद्र स. कांबळे गुरूजी यांच्या पुढाकाराने स्थानिक तालुकास्तरीय मुंबई २२ व ३७ चे नेतृत्व करणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या सन्माननीय अध्यक्षा वत्सला हिरे, सचिव विनोद (बाळा) केदारे, सचिव विलास (डॉन) कांबळे, सचिव सुरेश बागुल यांच्या सहभागातून आणि अरुणाचल प्रदेशातील शिक्षण पुर्ण करण्यासाठी वास्तव्यास असणारे भन्ते आर्या थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आखणी करण्यात आली होती.
सायन कोळीवाडा तालुक्यातील २९ बुध्द विहारामध्ये धम्मप्रचारासाठी नेहमी स्तुत्य उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या महाबोधी बुध्द विहार येथे प्रशिक्षणार्थी श्रामणेर संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. ह्यासाठी प्रामुख्याने बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्रमांक ७५६ चे सन्माननीय अध्यक्ष संजय जाधव (वाघणकर), सचिव दिपक अनंत कांबळे (बापेरकर), खजिनदार संदेश जाधव (शिलकर), प्रविण जाधव यांच्यासह महाबोधी महिला मंडळ आणि महाबोधी बुध्द विहार सामाजिक संस्था यांच्या संयुक्तरित्या व्यवस्थापनातून झाले.
ह्या ऐतिहासिक शिबीरात स्वईच्छिने सहभागी प्रशिक्षणार्थीं म्हणून श्रामणेर भन्ते शिवली (कु. सार्थक आशुतोष बोढारे), वय ६ वर्ष; श्रामणेर भन्ते तिस्सा (कु. प्रियांशू तुषार जाधव), वय ९ वर्षे; श्रामणेर भन्ते परमानंद (कु. प्रणित मिलींद सुरवाडे), वय ११ वर्षे; श्रामणेर भन्ते उपगुप्त (कु. कृतार्थ सचिन तांबे), वय १२ वर्षे; श्रामणेर भन्ते आनंद (कु. सोहम जितेंद्र कांबळे), वय १२ वर्षे; श्रामणेर भन्ते गिरीमानंद (कु. आशित चंद्रकांत उघाडे), वय १८ वर्षे; ह्या सर्वांना मार्गदर्शन आणि त्यांचे नेतृत्व करणारे श्रामणेर भन्ते प्रज्ञाज्योती (बौध्दाचार्य आयु. जितेंद्र सखाराम कांबळे), वय ४६ वर्षे इत्यादींनी प्रामुख्याने श्रामणेर प्रवज्जा शिबीरमध्ये सहभागी झाले होते.
धकाधकीच्या जीवनात स्पर्धेच्या युगात आपल्या मनशक्तीवर विपश्यना ध्यान साधनाव्दारे नियंत्रण मिळववून अंतर्भुत विकारांवर विजय मिळवणे, अधिकाधिक अभ्यासपुर्ण दाखले देणाऱ्या, विज्ञाननिष्ठ योग्य वास्तविकता दर्शवणाऱ्या पुस्तक वाचन करणे,
भारतीय प्राचीन भाषा पाली अवगत करणे आणि स्वरबध्देतून उच्चार करून अंतर्भुत मानसिक चंचलतेवर विजय मिळवून अंतर्मन जागृत करणे, ब्रम्हचर्य व आर्यमौन पालन करणे, एकमेकांविषयी सन्मान राखून आदरभाव निर्माण करणे, कोणतेही कार्य किंवा कोणताही अभ्यास करताना एकाग्रता साधून तडीस नेणे, आधुनिक जीवनशैलीतून निरोगी आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार पध्दती आचरण करणे, वेळेचे मूल्य जाणणे, सांसारिक भवचक्रातील ऐच्छिक सुखाच्या बंधनातून योग्य आवश्यक गोष्टींची निवड करणे, भिक्षाटन चारिका करत मनातील राग, व्देष, लोभ, मत्सर, अहंकारवृत्ती काढून सर्व प्राणीमात्रांना मैत्री भावना जागवणे, सर्वात महत्वाचे स्वतः ला स्वतः अनुशासन बांधणे, चालता-बोलता-बसता-उठता-जेवता-पिता-झोपता प्रत्येक गोष्टीमध्ये शिष्टाचार पाळणे अशा विविध अभ्यासक्रमातून प्रत्येक दिवशी विविधप्रकारे शिबीरा दरम्यान प्रशिक्षण दिले गेले. ह्या दरम्यान सकाळचा व संध्याकाळचा अल्पोपहार स्थानिक महाबोधी बुध्द विहार मधील सर्व उपासक उपासिकांनी श्रध्दाभावाने दान केले तर श्रामणेर भिक्खू संघासाठी पहिले भोजनदान कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर, रावळी कॅम्पच्या विश्वशांती बुध्द विहार कमिटीने बहुमान मिळवला, त्यानंतर क्रमाक्रमाने अल्मेडा कंपाऊंडचे महाबोधी बुध्द विहार कमिटी, बौध्द समाज संघ, रावळी कॅम्पच्या त्रिरत्न बुध्द विहार कमिटी, न्यु म्हाडा कॉलनी, कोकरी आगार मधील सम्राट अशोक बुध्द विहार कमिटी तर वैशाखी बुध्द पौर्णिमा च्या पावन दिनी कामगार नेते विलास (डॉन) कांबळे ह्यांनी आपल्या घरी वैयक्तिक भोजनदान करण्याचा बहुमान स्विकारला. शेवटच्या भोजनदानाचा सन्मान अल्मेडा कंपाऊंड मधील बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्रमांक ७५६ संलग्न महाबोधी महिला मंडळ आणि महाबोधी सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) ह्यांनी संयुक्तरित्या श्रामणेर भिक्खू संघाला श्रध्दापुर्वक भोजनदान दिले. तर भिक्षाटन चारिकाकरीता कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरातील बि.एम.सी. बिल्डिंग ई-९ चाळ कमिटीने यथायोग्य समर्पक भिक्षा देऊन श्रामणेर भिक्खू संघांचा आदरभाव राखला.
वैशाखी बुध्द पौर्णिमा निमित्ताने जगामध्ये माजलेल्या अराकतेविरुध्द विश्वशांतीचा संदेश पोहचवण्यासाठी सायन कोळीवाडा तालुक्यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या माध्यमातुन दरवर्षी पहाटे निघणाऱ्या बुध्द रुप प्रतिमेची धम्म प्रभात रॅली ह्यावेळी विशेष आकर्षक ठरली बाल वयात वयाच्या सहाव्या वर्षापासून ते सेहचाळीस वयातील सात श्रामणेर भिक्खू संघ आणि त्यांचे नेतृत्व करणारे अरुणाचल प्रदेशाहून आलेले भन्ते आर्या थेरो आणि भन्ते अरुणानंद थेरो.
शिबीराच्या प्रारंभी पहाटेच्या पहिल्या प्रहरी प्रतिक्षा नगर मध्यवर्ती असलेल्या जेतवन बुध्द विहारापासून विश्वशांती बुध्द विहार मार्गक्रमणिके दरम्यान येणाऱ्या प्रत्येक बुध्द विहार मधील प्रत्येक उपासक उपासिकांना मंगल पर्वणी ठरली. धम्म प्रभात रॅलीसाठी न चुकता फुलविक्रेते आणि समितीचे श्रध्दावान विनोद (बाळा) केदारे ह्यांनी स्वखर्चाने आकर्षक फुलांची सजावट केली तर जेतवन समाजिक प्रतिष्ठान (रजि.) तर्फे जेतवन बुध्द विहार मध्ये पहाटेपासून आलेल्या पुज्यनीय भिक्खु संघासहित सर्व बुध्द अनुयायांना अल्पोपहार, चहापान करण्यात आला होता तसेच शिस्तबध्द पध्दतीने बुध्द धून ध्वनीप्रेक्षपणातून शांतीचा संदेश देत पुज्यनीय थेरो, श्रामणेर भिक्खू संघ, बुध्दरुप प्रतिमेचा फुलांनी सजलेला धम्मरथ आणि सफेद वस्त्र परिधान केलेल्या पंचरंगी धम्मध्वज घेऊन एकमेकांच्या मागे दोन दोन जणांची उपासक उपासिकांची रांगेतून धम्म प्रभात रॅली मार्गक्रमण करतानादरम्यान मार्गक्रमणिकेतील प्रत्येक बुध्द विहार आणि धार्मिक संघटनांनीही सन्मानपूर्वक फुलाच्या वर्षावाने स्वागत करून अल्पोपहार वाटप केला शेवटी विश्वशांती बुध्द विहार कमिटीने धम्म प्रभात रॅलीचा सांगता समर्पक अल्पोपहार वाटप करून सामुदायिक सरणंतय गाथा घेऊन धम्म प्रभात रॅलीचा समारोप केला. त्यानंतर पंचशील नगर क्रमांक १ मधील माता रमाई बुध्द विहार, पंचशील क्रमांक २ मधील संबोधी बुध्द विहार व पंचशील नगर क्रमांक ३ मधील पंचशील बुध्द विहार येथे श्रामणेर भिक्खू संघांची धावती भेट देण्यात आली.
श्रामणेर प्रवज्जा शिबीर सुरू झाल्यापासून महाबोधी महिला मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा अनिता अनंत कांबळे, सचिव धनश्री प्रकाश जाधव व सारिका संजय जाधव, प्रमुख सल्लागार आशाताई रुके, सभासद पुजा दिपक कांबळे, स्वाती सिंग, प्रमिला जाधव, विद्या अभिजीत रुके, सुरेखा रुके, रंजिता संजय जाधव, कुमार साहिल साळुंखे आदींनी सकाळ व रात्रीचे व्यवस्थापन आणि विशाखा धम्म जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा उघाडे, सचिव आशा काळे, केदारे, सुर्वे, उभारे यांनी संध्याकाळचे व्यवस्थापन धम्मसेवक म्हणून श्रध्दापुर्वक संभाळले तर उपासिका श्रध्दा आषुतोष बोढारे यांनीही धम्मसेवा म्हणून भोजनवाटप मध्ये सहभाग दर्शवत होत्या.
सायन कोळीवाडा तालुक्यामध्ये प्रथम भरविण्यात आलेल्या श्रामणेर प्रवज्जा शिबीराचा प्रवरणा म्हणजेच समारोप अखिल भारतीय भिक्खु संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भदन्त शांतीरत्न महाथेरो यांच्या मार्फत करण्यात आले.
ह्यावेळी सायन कोळीवाडा तालुक्यातील बहुतांश बुध्द विहार कमिटी पदाधिकारी; धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे श्रध्दावान कार्यकर्ते आणि श्रामणेर प्रशिक्षणार्थींचे पालकांसह कुटुंब बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांच्या मते असे धर्मापलिकडे सज्जन माणूस घडवणारे संस्कार शिबीर सातत्याने व्हावे, अशा सर्वांच्या प्रतिक्रिया येत होत्या, त्यानुसार भदन्त शांतीरत्न महाथेरो आणि जितेंद्र कांबळे गुरूजींनी जनसमुदायांना शाश्वती दिली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या माध्यमातुन तयार झालेल्या संकल्पनेला शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद प्रत्येकाने आनंदाने चाखला आणि स्त्युप्त उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले तर पुज्यनीय भिक्खु संघाला आदरभावाने सचिन जाधव परिवार आणि आशुतोष बोढारे व अतुल बोढारे परिवारांकडून चिवर दान करण्यात आले.
शेवटी श्रामणेर प्रवज्जा ते प्रवरणा केलेल्या प्रशिक्षणार्थींना आकर्षक भेटवस्तू म्हणून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्यता दिलेल्या संपूर्ण बुध्द पुजा पाठ, शालेय शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केले गेले. अशी आधुनिक काळामध्ये बाल संस्कार घडविणारी शिबीर सातत्याने होणे हि काळाची गरज ओळखून प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक.
एक निरागस बालक आदर्श संस्कारातून घडून सजग नागरिक बनतो आणि तोच कर्तुत्ववान देशहित साधणारा बनू शकतो, ह्याच जेष्ठ पौर्णिमानिमित्ताने मंगल कामना. सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो, सुखी होवो.


0 टिप्पण्या