Ticker

6/recent/ticker-posts

माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांचे चिरंजीव प्राध्यापक पंकजसिंह खांबरे यांची असोशिएट डायरेक्टर पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून यथोचित सत्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 अमरावती :-श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत आर आर लाहोटी सायन्स कॉलेज मोर्शीचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे (सिसोदिया) यांचे सुपुत्र प्राध्यापक श्री पंकजसिंह खांबरे  (सिसोदिया)  यांची JSPM विद्यापीठ पुणे येथे असोसिएट डायरेक्टर पदावर पदोन्नती झाल्याबद्दल  संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावतीचे वतीने त्यांचे निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. 
  *याप्रसंगी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम गावंडे,  उपाध्यक्ष दामोदर पवार, सचिव चंदनसिंह राजपूत, कोषाध्यक्ष धनराज निपाने,माजी मुख्याध्यापक  गजेंद्र पाथरे,ईंजिनियर संजय खोंडे, दिपकराव जुनघरे,राजाभाऊ देशमुख, अनिलराव वानखडे, मधुकरराव भोपाळे, सुरेशराव शिर्के, ग्राहक परिषदेचे अध्यक्ष  अशोकराव हांडे. प्रा. देशमुख, सौ शांताबाई खांबरे,श्री चंदन सिंह ,सौ.आश्विनी ,सौ भाग्यश्री खांबरे, कु. समृद्धी,विशाखा व चि रूद्रवीर आदी स्नेही मंडळी उपस्थित होते. 
     या छोटेखानी सत्कार कार्यक्रमामध्ये श्री. पुरूषोत्तम गावंडे यांनी खांबरे परिवाराविषयी माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी यांचा आपल्या विशिष्ट शैलीत परिचय करून दिला. माजी प्राचार्य श्री दिलीपसिंह खांबरे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वेचे रहिवासी त्यांचे वडील शिक्षकीपेशात होते. खांबरे सर एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे.विविध क्षेत्रात त्याचे अलौकिक कार्य आहे. सामाजिक ,धार्मिक, राजकीय क्षेत्रात अलौकिक कार्य आहे. खांबरे सरांनी आयुष्यभर शिक्षणाची सेवा केली. त्याच परंपरेला त्यांचे चिरंजीव पंकजसिंह यांनी उंचीवर नेऊन ठेवले आहे असे मनोगतामधे सांगितले. प्रा. पंकजसिंह खांबरे यांनी माहिती तंत्रज्ञान या शाखेत ईजिंनियरिग करून प्राध्यापक या पदावर वरून जे एस. पी एम पुणे विद्यापीठाचे असोशिएट डायरेक्टर झाले याबद्दल खांबरे परिवारासह  ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य गण यांना अभिमान आहे. 
श्री दामोदर पवार यांनी प्रा पंकजसिंह खांबरे यांचे विषयी मत व्यक्त करतांना सांगितले कि. ज्ञानाची ज्योत पेटवणारा शिक्षक केवळ  विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत नाही तर संपूर्ण समाजाच्या विचारांना नवी दिशा देत असतो. या विचारांचे आमचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व माजी प्राचार्य  खांबरे सरांनी  हजारो विद्यार्थी घडविले.विद्यार्थासोबतच आपल्या मुलांना सुद्धा उच्च शिक्षित करून मानाचे स्थान प्राप्त केले. म्हणतात ना *शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी*  ही म्हण खांबरे परिवाराला तंतोतंत लागु होते.  मा. दिलीपसिंह खांबरे सर प्राचार्य पदापर्यंत  पोहचून सेवानिवृत्त झाले.  तर मुलगा सुद्धा कसा  मागे राहणार ! म्हणतात ना *बापसे बेटा सवाई* याप्रमाणे पंकजसिंह खांबरे यांनीसुद्धा प्राध्यापकापासुन तर   JSPM पुणे विद्यापीठाच्या असोशिएट डायरेक्टर पदापर्यंत मजल मारून खांबरे परिवारामध्ये एक मानाचा तुरा रोवला ही खरोखर गौरवाची बाब आहे.  त्याचे अनेक विद्यार्थी आय ए. एस. पदापर्यंत पोहोचले ते आजही त्यांचा गुरू म्हणून मान राखतात आणि गुरू असावा तर खांबरे सरासारखा अभिमानाने सांगतात हि किंमत खांबरे सरांनी कमावलेली आहे त्यामुळेच त्यांना परिवार, समाज व ज्येष्ठ नागरिक मंडळामधे मानाचे स्थान आहे. त्यानंतर  मंडळाचे माजी  ख्यातनाम सचिव   श्री प्रभाकरराव उमक यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे वतीने  प्राध्यापक पंकजसिंह खांबरे  यांचा सत्कार केल्याबद्दल  आनंद व्यक्त केला. खांबरे परिवार सुसंस्कृत आहे.प्रा.पंकजसिंह यांची  मेहनत, द चिकाटी व जिद्द यामुळेच ते एवढ्या मोठ्या वरिष्ठ पदावर पोहोचून खांबरे कुंटुबाचे नावलौकिक केले आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .  त्यानंतर मुख्याध्यापक श्री गजेंद्र पाथरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून श्री संत ज्ञानेश्वरांचा अभंग सुद्धा म्हटला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य पंकजसिंह  खांबरे यांनी सांगितले की त्यांनी
 *शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती* येथून *माहिती तंत्रज्ञान* या शाखेत *B.E.* पदवी प्राप्त केली. त्यानंतर *पुणे विद्यापीठातून संगणक शास्त्र* या विषयात *M.E.* पदवी संपादन केली.  शैक्षणिक कारकिर्दीत त्प्रथम *भारती विद्यापीठ, पुणे* येथे काही वर्षे *प्राध्यापक* म्हणून सेवा बजावली. त्यानंतर *रायसोनी महाविद्यालय, पुणे* येथे प्राध्यापक पदावर कार्य केले. पुढे *मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय* येथे *प्राध्यापक* तसेच *प्लेसमेंट अँड ट्रेनिंग ऑफिसर* म्हणून ४ ते ५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली.  
प्लेसमेंट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी  *राज्य व राष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट अधिकारी’* म्हणून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले.   
 उत्कृष्ट *फुटबॉल व क्रिकेटपटू* असुन . *अमरावती विद्यापीठाचे क्रिकेट कलर होल्डर* आहे. विद्यापीठ संघाकडून *राष्ट्रीय स्तरावर अष्टपैलू क्रिकेटपटू* म्हणून सुद्धा प्रतिनिधित्व केले आहे.  अनेक *संशोधन पेपर प्रकाशित* झाले आहेत. या सर्व प्रक्रियेतुन पुढे जात *संपूर्ण JSPM विद्यापीठ, पुणे चा अत्यंत महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या *सहसंचालक (Associate Director)* पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आज जे मी घडलो आहे हे माझ्या घराण्याचे व आई-वडिलांचे सुसंस्कार आहेत. यासाठी शिक्षक वृंद मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले ज्येष्ठ नागरिका मंडळाकडून आज माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी खरोखर आनंदी असून आपले सर्व श्रेष्ठ मांडणीचे आशीर्वाद शुभेच्छा मला मिळाल्या त्याबद्दल कृतज्ञ आहे. असे मत व्यक्त केले. त्यानंतर  प्राचार्य श्री दिलीप सिंह खांबरे सर यांनी परिवाराची विस्तृत माहिती दिली. आई-वडिलांचे संस्कार कसे होते आणि आम्ही कसे घडलो आमच्या आई-वडिलांचा दरारा होता तेवढाच आदर्श सुद्धा होता त्यांच्या प्रेरणेतून व आदर्शा मधून आम्ही घडलो.  मी डॉ  पंजाबराव देशमुख यांचा ऋणी आहे. त्याचे  श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकापासून तर प्राचार्य पदापर्यंत मी पोहोचलो हे खरोखर माझे अहोभाग्य आहे आणि त्यांच्यामुळेच मी माझे कुटुंब घडविले मुलांना घडविण्यामध्ये माझ्यापेक्षा माझी सहचारिणी व मुलाची आई सौ शांता हिचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच हे सर्व घडले असल्याचे मनोगतामध्ये व्यक्त केले. त्यानंतर अल्पपोहारानंतर छोटेखानी कार्यक्रमाची सांगता झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या