पूनम विलास मेश्राम हिने 90.11 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
👉 मुख्याध्यापक आशिष जगताप आणि शिक्षकांना दिले श्रेय.
चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :- महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये निकाल जाहीर करण्यात आले . जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देलोडा बुज. या शाळेचा ही निकाल घोषित करण्यात आला. वर्ग एक ते सात या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित बोलावून निकाल जाहीर करण्यात आले.इयत्ता सहावीत असलेल्या पुनम विलास मेश्राम या विद्यार्थिनीने ९०.११ टक्के घेऊन प्रथम पटकवला. तर द्वितीय क्रमांक कु. श्रावणी विनोद हुलके हिने 89 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला.कु तेजस गुरुदेव पेंदाम इयत्ता सहावी या विद्यार्थ्यांने 85 टक्के घेऊन तृतीय क्रमांकाचे स्थान मिळविले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बुज. येथील मुख्याध्यापक मा. आशिष जगताप यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. सर्व गुणवंत आणि उत्तीर्ण विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक आशिष जगताप, शिक्षक आणि पालकांना आपल्या यशाचे श्रेय दिले. मुख्याध्यापक जगताप यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून अभिनंदन केले. इयत्ता सातवीतुन प्रथम क्रमांकाचे स्थान पटकविणाऱ्या कु. गौरी जगदीश बावणे , द्वितीय क्रमांक अंशू मडावी या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. निकाल जाहीर करतांना शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरीक , पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या