Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपुरात रंगला 'सहज सुचलं' परिवाराचा स्नेहमेळावा; संपादिका प्रीती साहू यांच्याशी संवाद

ॲड.मेघा धोटे यांनी केले साहू यांचे स्वागत!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर : वुमेन्स न्यूज चॅनेलच्या मुख्य संपादिका प्रीती साहू (अमरावती) या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता, 'सहज सुचलं' परिवाराच्या वतीने त्यांचा भावपूर्ण स्वागत व परिसंवाद सोहळा पार पडला. 'सहज सुचलं काव्यकुंज'च्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधिवक्ता मेघा धोटे यांनी प्रीती साहू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवोदित कवयित्री प्रियांका बेंद्रे व नाट्य कलावंत टीना उराडे यांनी साहू यांची खास शैलीत ओळख करून दिली. यावेळी ग्रामीण भागातील शिक्षिका वंदना उपगंतलावार यांनी मधुर गीत सादर केले. तर निवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते यांनी मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडके यांच्या खंबीर नेतृत्वाचा गौरव केला. परिसंवादात विद्या पिंजरकर व शैला चिमड्यालवार यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाचे अनुभव मांडले.
मुलाखतीदरम्यान बोलताना अधिवक्ता मेघा धोटे यांनी, चॅनेलच्या माध्यमातून समाजातील पीडित महिलांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजसेविका सुवर्णा लोखंडे यांनी खऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान व्हावा असे सांगितले. याप्रसंगी 'सुवर्ण भारत'चे विदर्भ विशेष प्रतिनिधी किरण घाटे यांनी प्रीती साहू यांचे स्वागत केले आणि नूपुर मोडके, साक्षी वाडगुरे, पूनम वासाडे, शिवानी झाडे व टीना उराडे यांच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. येत्या ५ जुलै रोजी चंद्रपूर मुक्कामी होणाऱ्या मुख्य विशेष कार्यक्रमाला मायाताई कोसरे, रंजू मोडके, नलिनी आडपवार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती किरण घाटे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या