Ticker

6/recent/ticker-posts

मंगेश बावणेंचा प्रेरणादाय उपक्रमरुग्णांसोबत साजरा केला वाढदिवस!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : आजच्या धावपळीच्या आणि दिखाऊपणाकडे झुकणाऱ्या काळात वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते मंगेश बावणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे रुग्णांना फळवाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. त्यांच्या या कृतीमुळे वाढदिवसाला सामाजिक जाणीवेची अर्थपूर्ण जोड मिळाली.

यावेळी  बावणे यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डात जाऊन रुग्णांची आस्थेने भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत लवकर आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या. 
या प्रसंगी रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. 
सदरहू उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.

या वेळी लक्ष्मण यादव, नरेश आनंद, रोहित आमटे, सोनू तुरणकर, संकेत चौधरी, भुरूभाई, गणेश बावसने आणि रोहित चुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मित्रपरिवाराने मंगेश बावणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.

मंगेश बावणे म्हणाले,कि “समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामुळे वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे, हीच खरी आनंदाची अनुभूती आहे. समाजोपयोगी कार्यातूनच वाढदिवस साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.”

 बावणे यांच्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक उत्तरदायित्वाचा सकारात्मक संदेश पोहोचला असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेला हा उपक्रम अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या