चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी: जिल्हा परिषद कन्या शाळा हंडरगुळी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव, नवागत विद्यार्थिनींचे स्वागत, मोफत गणवेश वाटप तसेच पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोज कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती श्री बापूसाहेब उद्धवराव भोसले पाटील, गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री विजयकुमार किशनराव आंबेकर, उपसरपंच श्री बालाजी विनायकराव भोसले पाटील, केंद्रप्रमुख श्री अशोकराव खेळगे, श्री बसवराज धुपे, श्री एजाज चौधरी उपस्थित होते.
यावेळी नवागत विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात नियमित उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन मान्यवरांनी विद्यार्थिनींना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सूर्यवंशी ताई, श्री शेटकार सर, श्री बालाजी कदम, श्री गणेश बेल्लाळे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवर, पालक व विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात आणि अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.


0 टिप्पण्या