Ticker

6/recent/ticker-posts

साकोली नगरपरिषदेत पल्स पोलिओ मोहिम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-देशभरात राबविल्या जाणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या अंतर्गत, साकोली-शेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील अनेक ठिकाणी पोलिओ डोस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. साकोली नगरपरिषदेचे जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक इंजि. संदीपभाऊ बावनकुळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आरोग्य सेवक अल्पेश ढोरे, आरोग्य सेवक अतुल बुरडे यांच्यासह शहरातील आशा वर्कर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. मोहिमेचा शुभारंभ करताना नगरसेवक इंजि. संदीपभाऊ बावनकुळे म्हणाले की, "भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि दिव्यांगमुक्त राहण्यासाठी पल्स पोलिओ मोहीम हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. साकोली-शेंदूरवाफा शहरातील एकही बालक या डोसपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण काळजी नगरपरिषदेची आरोग्य यंत्रणा घेत आहे. शहरातील पालकांनीही जबाबदारी ओळखावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या