गटनेते इंजि. संदीप बावनकुळे यांच्या पुढाकाराला यश
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :- प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ (प्रभाग क्रमांक ५) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक २ च्या इमारत दुरूस्ती व रखडलेल्या नागरी सुविधांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जन आरोग्य समितीचे अध्यक्ष, नगरसेवक तथा गटनेते इंजि. संदीप बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून या दोन्ही केंद्रांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांच्या इमारतींकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. यामुळे इमारतींची दुरवस्था झालेली होती. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांची ही हक्काची आरोग्य केंद्रे पुन्हा सुसज्ज व्हावीत यासाठी इंजि. संदीप बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ च्या इमारतीसाठी १० लाख रुपये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. २ च्या इमारतीसाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
इमारतींची प्रत्यक्ष पाहणी व तातडीने कामाचे निर्देश
निधी मंजूर होताच जन आरोग्य समितीचे अध्यक्ष इंजि. संदीप बावनकुळे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दोन्ही आरोग्य केंद्रांच्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. इमारतींची दुरवस्था झालेल्या भागांची बारकाईने पाहणी करून दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले,


0 टिप्पण्या