चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:-कळमणा मार्केट परिसरात संशयित हालचालींवर लक्ष ठेवत असताना कळमणा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 4 किलो 168 ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले दुचाकी वाहन व अन्य साहित्यही जप्त करण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपींपैकी एकाने राज्याबाहेरून गांजा आणल्याचे निष्पन्न झाले असून या अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
मा. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर शहराला नशामुक्त करण्यासाठी पोलिसांची कठोर कारवाई सातत्याने सुरू असून अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे.


0 टिप्पण्या