राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी व त्यांच्या वारसांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात तसेच दि. २२ जून २०२६ पासून सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी
या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी, चंद्रपूरच्या वतीने आज आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले.
यापूर्वी दि. २७ जून २०२६ रोजी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते, सफाई कर्मचारी व त्यांच्या वारसांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्यानंतर त्या पूर्णपणे न्याय्य असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले.
निवेदनामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस नियुक्तीचा प्रश्न तातडीने निकाली काढणे, सर्व प्रलंबित न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे, शासन निर्णय व न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच उपोषणकर्त्यांशी त्वरित चर्चा करून त्यांच्या आंदोलनावर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना डॉ. विश्वनाथ लाडे (चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष), मनोहर साकरे (विधानसभा कोषाध्यक्ष), नितेश नरगडे (विधानसभा उपाध्यक्ष, चंद्रपूर), इंजि. विमित कोसे (शहराध्यक्ष, चंद्रपूर), किशोर चिकाटे (बाबूपेठ झोन अध्यक्ष), दादाजी ढाकडे आणि कामडे उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टीने प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी केली.


0 टिप्पण्या