आमदार संजयभाऊ देरकर यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ऑगस्टला आयोजन
वणी प्रतिनिधी : राजेश येसेकर
वणी : शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी आमदार संजयभाऊ देरकर, वणी विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान संत श्री.अंकुश पाटील यांची कृषीतंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व अनुभव कथन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दि. 18/08/2026 रोजी सकाळी 10.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय, मजरा (नांदेपेरा रोड), ता. वणी, जि. यवतमाळ येथे हा मेळावा होणार आहे.
1. घरच्या घरी स्वस्तात कृषीखते बनविण्याचे प्रशिक्षण
उदा: 19-19-19, 12-61-00, 00-60-20, 00-52-34, 13-40-13, 13-0-45 व इतर
2. घरच्या घरी स्वस्त कृषी संजिवके, किटकनाशके व बुरशीनाशके बनविण्याचे प्रशिक्षण
उदा: ह्युमीक ऑसिड, फुलविक ऑसिड, अमिनो ऑसिड, ऑर्थोलीसीलीक ऑसिड, लाईम सल्फर, सिलिकॉन स्टिकर, बायोझाईम, ऑर्गनिक कार्बन, माईक्रो न्युट्रियंट आदी.
या कार्यशाळेसाठी विज्ञान संत श्री. अंकुश पाटील, सांगली हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत एस.आर.टी. शेती मार्गदर्शक उमेशभाऊ पोहदरे, रा. येवती पोहणा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
शेती फायदेशीर व कमी खर्चाची कशी होईल याबाबत शेतकऱ्यांना यावेळी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा:
प्रकाशराव चिकटे - 9623242170, पांडुरंगजी हेपट - 9823445916, प्रेमानंदजी धानोरकर - 9284614950, विनायक मत्ते - 9881621723, अनिल पा. देऊळकर - 7972916596, संजय पा. धांडे - 9850331684, अशोकराव वानखेडे - 9822642610
टीप: शेतकऱ्यांनी सोबत वही व पेन आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


0 टिप्पण्या