Ticker

6/recent/ticker-posts

इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन २ ऑक्टोबरला मूलमध्ये; चंद्रपुरात पार पडली आयोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक


प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे 'भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस' (इंटक) च्या वतीने भव्य राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी रविवारी काँग्रेस भवन, चंद्रपूर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी दत्तात्रय समर्थ आणि चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही बैठक उत्साहात पार पडली. अधिवेशनाचे नियोजन आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी 'ठराव क्र. ०५/२६' अन्वये एक विशेष आयोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे. आगामी काळात ही समिती अधिवेशनाच्या तयारीला अधिक गती देणार आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनात कामगारांचे हक्क, त्यांच्या रोजच्या विविध समस्या, संघटनात्मक बळकटीकरण तसेच बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील हे अधिवेशन होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात कामगार वर्गात आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
या बैठकीला प्रफुल गज्जलवार, सतीश सुंकरवार, किरण पोरेड्डीवार, अनिल कुंटावार, आकाश ठाकरे, साईनाथ जिडगलवार, फुलचंद गोंगले, अनिल निकोडे यांच्यासह युवक काँग्रेसचे मूल तालुका अध्यक्ष पवन निलमवार आणि रामकुमार चिताडे, तुकाराम गुरनुले, अनिल दिकोण्डवार, रंजित येणगंटीवार, अंकुश कामडी, दिनेश गुरनुले, क्रिष्णा बोरेवार आदी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्याची मान उंचावणारे हे राष्ट्रीय अधिवेशन भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले.
ह्या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील पदाधिकारी व सदस्यगण मोठ्या संख्येंने उपस्थित राहणार असल्याची माहिती दत्तात्रय समर्थ यांनी काल एका भेटीत या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या